S M L

बेळगावमध्ये शिवसेनेच्या विरोधात आंदोलन ; उध्दव यांची कारवाईची मागणी

28 नोव्हेंबरबेळगावात कन्नड रक्षक वेदिके संघटनेने आज बेळगावमध्ये शिवसेनेविरोधात आंदोलन केलं. कन्नड साहित्यिक डॉ.चंद्रशेखर कंबार यांनी बेळगावातील मराठी लोकांवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून कंबार यांच्यावर टीका करण्यात आली होती. याविरोधात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. आता या लोकांवर कर्नाटक राज्यात सत्ता असलेल्या भाजपने कारवाई करावी आणि त्यांना ते शक्य नसेल तर शिवसेना आपल्या पद्धतीनं त्यांना उत्तर देईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. सामना वृत्तापत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांच्या विरोधात टीका केली होती. तसेच बेळगावपालिका बरखास्त करावी अशी मागणीही त्यांनी अग्रलेखात केली होती. याच्याच विरोधात कन्नड वेदिकेने आंदोलन केलं. शहरातील चानाम्म चौकात हे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी ऑफिस समोर निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून कन्नड वेदिक संघटनेने बेळगाव शहरात मराठी विरोधी आंदोलनं सुरूच ठेवली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 12:14 PM IST

बेळगावमध्ये शिवसेनेच्या विरोधात आंदोलन ; उध्दव यांची कारवाईची मागणी

28 नोव्हेंबर

बेळगावात कन्नड रक्षक वेदिके संघटनेने आज बेळगावमध्ये शिवसेनेविरोधात आंदोलन केलं. कन्नड साहित्यिक डॉ.चंद्रशेखर कंबार यांनी बेळगावातील मराठी लोकांवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून कंबार यांच्यावर टीका करण्यात आली होती. याविरोधात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. आता या लोकांवर कर्नाटक राज्यात सत्ता असलेल्या भाजपने कारवाई करावी आणि त्यांना ते शक्य नसेल तर शिवसेना आपल्या पद्धतीनं त्यांना उत्तर देईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

सामना वृत्तापत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांच्या विरोधात टीका केली होती. तसेच बेळगावपालिका बरखास्त करावी अशी मागणीही त्यांनी अग्रलेखात केली होती. याच्याच विरोधात कन्नड वेदिकेने आंदोलन केलं. शहरातील चानाम्म चौकात हे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी ऑफिस समोर निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून कन्नड वेदिक संघटनेने बेळगाव शहरात मराठी विरोधी आंदोलनं सुरूच ठेवली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close