S M L

बुलडाण्याजवळ 2 लक्झरी बसचा भीषण अपघात, 15 ठार

28 नोव्हेंबरनागपूर औरंगाबाद महामार्गावर बुलडाणा जवळ दोन लक्झरी बसेसची समोरा समोर टक्कर झाली. या अपघातानंतर दोन्ही बसेसनी पेट घेतला त्यामुळे बसमधील पंधरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की या दोन्ही लक्झरी बसेस जळाल्यात. त्यात 57 प्रवासी अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाण्याजवळील मेहकरच्या सुलतानहूर गावात हा अपघात झाला. पुण्याहुन नागपूरला जाणारी रॉयल ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आणि नागपूरहून पुण्याला जाणारी सैनी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसेसमध्ये हा अपघात झाला. रॉयल ट्रॅव्हल्सची बस स्लीपर कोच होती. या अपघातात दोन्ही बसेसचे ड्रायव्हरही ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या सर्व प्रवाश्यांना मेहकर इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाल्याचं प्रवाशांनी म्हणणं आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उड्या टाकून आपला जीव वाचवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 09:15 AM IST

बुलडाण्याजवळ 2 लक्झरी बसचा भीषण अपघात, 15 ठार

28 नोव्हेंबर

नागपूर औरंगाबाद महामार्गावर बुलडाणा जवळ दोन लक्झरी बसेसची समोरा समोर टक्कर झाली. या अपघातानंतर दोन्ही बसेसनी पेट घेतला त्यामुळे बसमधील पंधरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की या दोन्ही लक्झरी बसेस जळाल्यात. त्यात 57 प्रवासी अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाण्याजवळील मेहकरच्या सुलतानहूर गावात हा अपघात झाला.

पुण्याहुन नागपूरला जाणारी रॉयल ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आणि नागपूरहून पुण्याला जाणारी सैनी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसेसमध्ये हा अपघात झाला. रॉयल ट्रॅव्हल्सची बस स्लीपर कोच होती. या अपघातात दोन्ही बसेसचे ड्रायव्हरही ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या सर्व प्रवाश्यांना मेहकर इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाल्याचं प्रवाशांनी म्हणणं आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उड्या टाकून आपला जीव वाचवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close