S M L

शिवसेनेत जुन्या शिलेदारांचे पुन:प्रवेशाचे वारे !

विनोद तळेकर, मुंबई28 नोव्हेंबरमुंबई महापालिका निवडणुकासाठी, काँग्रेस-राष्ट्रवादी संभाव्य आघाडी आणि मनसेची मुंबईत वाढत चालली ताकद, या गोष्टी लक्षात घेता, शिवसेनेनं, सेना सोडून गेलेल्या आपल्या जुन्या शिलेदारांना सेनेत पुन्हा प्रवेश द्यायचा सपाटा लावला आहे. नारायण राणेंसोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे, जयवंत परब यांनी बाळासाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुनप्रवेश केला. काँग्रेसमध्ये गेल्यावर, राणे आणि परब यांचं बिनसलं आणि परब पुन्हा सेनेत परतले.जयवंत परब यांच्या अगोदर, श्रीकांत सरमळकर या राणे समर्थकाला सेनेनं मानानं प्रवेश दिला. त्याचबरोबर मनसेतून परत आलेले, राजा चौगुले आणि संजय घाडी या राज समर्थकांना सेनेनं थेट उपनेतेपद दिलं. सदा सरवणकर यांच्यासारखा नेताही शिवसेनेत परतण्यासाठी उत्सुक आहे.पण त्यांचा प्रवेश सध्यातरी लांबला.शिवसेना सोडताना यापैकी प्रत्येकाने उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली होती. पण इतर पक्षात या नेत्यांना बस्तान बसवता आलं नाही. त्यामुळे घराबाहेर पडलेलं सेनेचे शिलेदार पुन्हा जुन्या घरी परतायला लागले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 02:32 PM IST

विनोद तळेकर, मुंबई

28 नोव्हेंबर

मुंबई महापालिका निवडणुकासाठी, काँग्रेस-राष्ट्रवादी संभाव्य आघाडी आणि मनसेची मुंबईत वाढत चालली ताकद, या गोष्टी लक्षात घेता, शिवसेनेनं, सेना सोडून गेलेल्या आपल्या जुन्या शिलेदारांना सेनेत पुन्हा प्रवेश द्यायचा सपाटा लावला आहे.

नारायण राणेंसोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे, जयवंत परब यांनी बाळासाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुनप्रवेश केला. काँग्रेसमध्ये गेल्यावर, राणे आणि परब यांचं बिनसलं आणि परब पुन्हा सेनेत परतले.

जयवंत परब यांच्या अगोदर, श्रीकांत सरमळकर या राणे समर्थकाला सेनेनं मानानं प्रवेश दिला. त्याचबरोबर मनसेतून परत आलेले, राजा चौगुले आणि संजय घाडी या राज समर्थकांना सेनेनं थेट उपनेतेपद दिलं. सदा सरवणकर यांच्यासारखा नेताही शिवसेनेत परतण्यासाठी उत्सुक आहे.पण त्यांचा प्रवेश सध्यातरी लांबला.

शिवसेना सोडताना यापैकी प्रत्येकाने उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली होती. पण इतर पक्षात या नेत्यांना बस्तान बसवता आलं नाही. त्यामुळे घराबाहेर पडलेलं सेनेचे शिलेदार पुन्हा जुन्या घरी परतायला लागले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close