S M L

मंदीमुळे कच्च्या हिर्‍यांची आयात थांबणार

19 नोव्हेंबर, सुरतकिन्नरी पटेलहिर्‍यांच्या पॉलिशिंग व्यवसायावरही सध्या मंदीचं सावट आहे. त्यामुळेच व्यापार्‍यांच्या संघटनेने पैलू न पाडलेल्या हिर्‍यांची म्हणजेच कच्च्या हिर्‍याची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.हिरा आणि सुरत यांच्यात एक अतुट नातं आहे. सुरतमध्ये हिरे पॉलिश करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पण जागतिक मंदीमुळे तिथंही सध्या पॉलिश केलेल्या हिर्‍यांची मागणी घटली आहे. याचमुळे जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलनं 25 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान कच्च्या हिर्‍याची आयातीवर निर्बंध घातले आहेत. पण त्यामुळे हिरे व्यापारी मात्र चिंतेत आहेत. 'या निर्णयामुळे काही जणांचा फायदा होणार आहे.पण आमच्यापैकी बर्‍याचजणांना नुकसानही सहन करावं लागेल. एखाद्याला जरी नुकसान झालं तरी त्याचा फटका सगळ्याचं हिरा व्यापार्‍यांना बसतोय' असं कीर्ती शाह या व्यापार्‍यानं सांगितलं. पॉलिश झालेल्या हिर्‍यांसाठी साठ टक्के मागणी अमेरिकेतून असते. पण ही मागणी कमी झाली आहे. ऑक्टोबर 2008 मध्ये हिर्‍यांची निर्यात ऑक्टोबर 2007 च्या तुलनेत वीस टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळं काऊन्सिलनं आयात बंद करण्याचा हा निर्णय घेतलाय. काऊन्सिलचा हा निर्णय पॉलिश डायमंन्ड निर्यात करणार्‍या बड्या निर्यातदारांच्या फायद्याचा आहे, पण त्यामुळे सुरतमधल्या दहा लाख हिरे कर्मचार्‍यांना पंचेचाळीस दिवस सक्तीनं बिनपगारी सुट्टीवर जावं लागलं आहे. 'उत्पादन खर्चात कपात करणं ठीक आहे.पण दहा लाख कर्मचार्‍यांचा प्रश्न महत्वाचा आहे. जर त्यांना किमान पगार मिळाला तर आम्हाला उत्पादन खर्च कमी केल्याबद्दल काहीही वाटणार नाही' असं इन्ट्युक गुजरातचे प्रेसिडेंट निशाद पारेख यांनी सांगितलं.पण येत्या काही दिवसांत मंदीचं हे सावट लवकर दूर होईल असं निर्यातदारांना वाटत आहे. 'पॉलिश डायमंडचा साठा मर्यादीत होता.पण आता मात्र तो प्रश्न बर्‍यापैकी सुटलाय.आणि कदाचित अमेरिकेतली परिस्थिती नक्कीच सुधारेल. असं बदमेचा इम्पेक्सचे डायरेक्टर प्रकाश बदमेचा यांनी सांगितलं.' एकूणच ही मंदी लवकरात लवकर संपावी अशीच अपेक्षा इथले कामगार करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 11:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close