S M L

प्रसाद पुरोहितला 2 दिवसांची पोलीस कोठडी

19 नोव्हेंबर, पुणेमालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी प्रसाद पुरोहितनं आज पुणे न्यायालयात सीबीआयवरच आरोप केले. सीबीआय आणि हरियाणा पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं त्याच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं. बॉम्बस्फोट प्रकरणातले दोन प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा ताबा पुणे पोलिसांनी मागितला होता. त्यानंतर न्यायालयानं प्रसाद पुरोहितचा ताबा पुणे एटीएसकडं दिला. तसंच खडकी इथल्या चर्चवरील हल्ल्याप्रकरणी समीर कुलकर्णीचा ताबाही पुणे पोलिसांना हवा आहे. कोर्टानं त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहितचे एकेक गुन्हे आता बाहेर पडू लागले आहेत. पिस्तुलाचा बनावट परवाना दिल्याच्या आरोपाखाली पुरोहित सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान त्याच्याविरोधात पोलिसांना आणखी माहिती मिळाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाला अभिनव भारत संघटनेच्या सुधाकर चतुर्वेदी याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली आहे. पुरोहितनं सुधाकरला लष्कराचं ओळखपत्र मिळवून दिल्याची माहिती सुधाकर चतुर्वेदीनं नार्को टेसमध्ये दिली आहे. लष्कराचं ओळखपत्र, पिस्तुल आणि जिवंत काडतुसं बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चतुर्वेदीला अटक केलं होती. सुधाकरच्या नार्को टेस्टमधून पोलिसांना त्याचे आणि पुरोहितचे जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 11:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close