S M L

ऑन ड्युटी झोपणार्‍या पोलिसांवर होणार कारवाई

29 नोव्हेंबरडोंबिवलीत रविवारी पहाटे दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दरोडेखोरांना पकडण्यात आलं आहे. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पाच जण जखमीही झाले. प्रत्यक्षात दरोडा पडला त्यावेळी नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठलं तेव्हा इथं पोलीस झोपलेले असल्याचं दिसलं होतं. आयबीएन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आता पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. ठाण्याचे पोलीस कमिश्नर के.पी.रघुवंशी यांनी डोंबिवली आणि खोणीगाव या दोन्ही ठिकाणी भेट दिली. त्याच बरोबर या पोलिसांची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 05:18 PM IST

ऑन ड्युटी झोपणार्‍या पोलिसांवर होणार कारवाई

29 नोव्हेंबर

डोंबिवलीत रविवारी पहाटे दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दरोडेखोरांना पकडण्यात आलं आहे. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पाच जण जखमीही झाले. प्रत्यक्षात दरोडा पडला त्यावेळी नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठलं तेव्हा इथं पोलीस झोपलेले असल्याचं दिसलं होतं. आयबीएन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आता पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. ठाण्याचे पोलीस कमिश्नर के.पी.रघुवंशी यांनी डोंबिवली आणि खोणीगाव या दोन्ही ठिकाणी भेट दिली. त्याच बरोबर या पोलिसांची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close