S M L

अखेर पेडर रोडवरील फ्लायओव्हर रद्द

04 डिसेंबरपेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लता मंगेशकर आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा फ्लायओव्हर रद्द करण्यात आला आहे. आता पेडर रोड ऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी मंदिरानजीकच्या कॅडबरी जंक्शनवर दोन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी निवीदाही मागवण्यात आल्या आहेत. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी सुरु केलेल्या विरोधाचं नंतर पेडररोड रहिवासी समितीत रुपातंर झालं. याप्रकरणी MSRDCच्या वतीने अनेक वेळा जनसुनावणी झाली. मंत्रिमंडळ समितीत हा निर्णय झाला असला तरी अद्याप नोटिफिकेशन मात्र निघालेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2011 11:00 AM IST

अखेर पेडर रोडवरील फ्लायओव्हर रद्द

04 डिसेंबर

पेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लता मंगेशकर आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा फ्लायओव्हर रद्द करण्यात आला आहे. आता पेडर रोड ऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी मंदिरानजीकच्या कॅडबरी जंक्शनवर दोन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी निवीदाही मागवण्यात आल्या आहेत. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी सुरु केलेल्या विरोधाचं नंतर पेडररोड रहिवासी समितीत रुपातंर झालं. याप्रकरणी MSRDCच्या वतीने अनेक वेळा जनसुनावणी झाली. मंत्रिमंडळ समितीत हा निर्णय झाला असला तरी अद्याप नोटिफिकेशन मात्र निघालेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close