S M L

भारताचा 5 गडी राखून विजय

02 डिसेंबरभारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानची दुसरी वन डेही रंगतदार झाली. आणि भारतीय टीमने पाच विकेट राखून ती आरामात जिंकली. मॅचवर बहुतांश वेळ भारतीय टीमनेच वर्चस्व गाजवलं. पण रंगत आणली ती रवी रामपॉलच्या 86 रन्सच्या इनिंगने....सेहवागने टॉस जिंकून विंडीजला पहिली बॅटिग दिल्यावर त्यांची अवस्था एकवेळ आठ विकेटवर 149 अशी झाली होती. पण रवी रामपॉल दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. आणि त्याने खेळाचा नूर पालटला. रोश सोबत दहाव्या विकेटसाठी 99 रनची पार्टनरशिप करत त्याने विंडीजला 269 रनचा स्कोअर उभारुन दिला. त्यामुळे ही मॅच लो स्कोअरिंग झाली नाही. भारतीय टीमची सुरुवात थोडी खराब होती. पार्थिव आणि गंभीर 29 रनमध्येच आऊट झाले. सेहवागही 26 रन करुन आऊट झाला. पण त्यानंतर विराट कोहली आणि इनफॉर्म रोहीत शर्माने इनिंग सावरली. आणि 163 रनची पार्टनरशिप केली. कोहलीने तर आपली आठवी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी ठोकली. कोहली 117 रनवर आऊट झाल्यावर रैनाही डकवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण रोहीत शर्मा पिचवर कायम होता. आणि त्याने टीमला विजय मिळवून दिला. आता तिसरी वन डे सोमवारी अहमदाबादमध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2011 03:46 PM IST

भारताचा 5 गडी राखून विजय

02 डिसेंबर

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानची दुसरी वन डेही रंगतदार झाली. आणि भारतीय टीमने पाच विकेट राखून ती आरामात जिंकली. मॅचवर बहुतांश वेळ भारतीय टीमनेच वर्चस्व गाजवलं. पण रंगत आणली ती रवी रामपॉलच्या 86 रन्सच्या इनिंगने....सेहवागने टॉस जिंकून विंडीजला पहिली बॅटिग दिल्यावर त्यांची अवस्था एकवेळ आठ विकेटवर 149 अशी झाली होती. पण रवी रामपॉल दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. आणि त्याने खेळाचा नूर पालटला. रोश सोबत दहाव्या विकेटसाठी 99 रनची पार्टनरशिप करत त्याने विंडीजला 269 रनचा स्कोअर उभारुन दिला. त्यामुळे ही मॅच लो स्कोअरिंग झाली नाही. भारतीय टीमची सुरुवात थोडी खराब होती. पार्थिव आणि गंभीर 29 रनमध्येच आऊट झाले. सेहवागही 26 रन करुन आऊट झाला. पण त्यानंतर विराट कोहली आणि इनफॉर्म रोहीत शर्माने इनिंग सावरली. आणि 163 रनची पार्टनरशिप केली. कोहलीने तर आपली आठवी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी ठोकली. कोहली 117 रनवर आऊट झाल्यावर रैनाही डकवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. पण रोहीत शर्मा पिचवर कायम होता. आणि त्याने टीमला विजय मिळवून दिला. आता तिसरी वन डे सोमवारी अहमदाबादमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2011 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close