S M L

मॅनेजमेंट स्कूल्सनाही मंदीची झळ.

19 नोव्हेंबर अहमदाबादमेघदूत शेरॉन सगळीकडेच मंदी सुरू आहे. आणि आता भारतातल्या टॉप मॅनेजमेंट स्कूल्सनाही याची झळ बसायला लागली आहे. यातच आयआयएम अहमदाबादमधल्या यावर्षीच्या समर प्लेसमेंट्समध्ये एक वेगळाच ट्रेंड दाखवत आहे. फायनान्शियल सेक्टर ही या मुलांची नोकरीसाठीची पहिली पसंती राहिलेली नाही. यातले अनेकजण आता मार्केटिंगसारख्या क्षेत्रांकडे वळले आहेत. आयआयएम - एचे संचालक समीर बरुआ सांगतात लेहमन ब्रदर्स वगळता बाकी सगळ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी आल्या आहेत. पण त्यांनी दिलेल्या ऑफर्सची संख्या मात्र कमी झाली आहे. जागतिक मंदीचा परिणाम फायनल प्लेसमेंटच्या पगारांवर झालाच तर तो पाच महिन्यानंतर कळेल.2007मध्ये 57 % मुलांनी फायनान्शियल सेक्टरला पसंती दिली होती. पण यावर्षी फक्त 32 % मुलांनी फायनान्शियल सेक्टरला पसंती दिली. असं असलं तरी समर इंटर्नशिप करू इच्छिणा-या सगळ्या 300 मुलांना प्लेसमेंट मिळायली आहे. यातल्या 90 इंटरनॅशनल ऑफर्स आहेत. तसंच आयआयएम बंगलोरमध्ये नोकरी देणा-या कंपन्यांची संख्या 66 वरून वाढून 100 वर गेली आहे.आता मार्चमध्ये फायनल प्लेसमेंट करताना आयआयएमना जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्लेसमेंटसची एक आणखी वेगळी गोष्ट म्हणजे मीडिया एन्टरटेन्मेन्ट आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा वाढलेला सहभाग.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 12:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close