S M L

रणजीच्या दुसर्‍या मॅचला आगरकरला डच्चू

04 डिसेंबररणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत ओरिसावर विजय मिळवल्यानंतर मुंबई टीम सौरष्ट्रविरुध्दच्या लढतीसाठी सज्ज झाली आहे. या मॅचसाठी मुंबईची टीम जाहीर करण्यात आली आहे. पण या टीममध्ये अजित आगरकरचा समावेश नाही. ओरिसाविरुध्दच्या लढतीत टीममधून वगळल्याने अजित आगरकरने नाराजी व्यक्त करत मुंबईला गाठली होती. सौराष्ट्रविरुध्दच्या लढतीसाठी आपण उपलब्ध नसल्याचं आगरकरनं एमसीएला कळवलं. पण आगरकरनं स्वता कळवलंय की त्याची विकेट काढण्यात आलीय हे मात्र गुलदस्त्यात आहे. आगरकरऐवजी मुंबई टीममध्ये क्षेमल वायंगणकरची निवड करण्यात आली आहे. 6 डिसेंबरपासून मुंबई - सौराष्ट्रदरम्यानची मॅच खेळवली जाणार आहे. दरम्यान, या लढतीसाठी फास्ट बॉलर झहीर खानचाही मुंबई टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी झहीर खानला रणजी क्रिकेटमध्ये खेळू आपला फिटनेस सिध्द करायचे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2011 01:31 PM IST

रणजीच्या दुसर्‍या मॅचला आगरकरला डच्चू

04 डिसेंबर

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत ओरिसावर विजय मिळवल्यानंतर मुंबई टीम सौरष्ट्रविरुध्दच्या लढतीसाठी सज्ज झाली आहे. या मॅचसाठी मुंबईची टीम जाहीर करण्यात आली आहे. पण या टीममध्ये अजित आगरकरचा समावेश नाही. ओरिसाविरुध्दच्या लढतीत टीममधून वगळल्याने अजित आगरकरने नाराजी व्यक्त करत मुंबईला गाठली होती. सौराष्ट्रविरुध्दच्या लढतीसाठी आपण उपलब्ध नसल्याचं आगरकरनं एमसीएला कळवलं. पण आगरकरनं स्वता कळवलंय की त्याची विकेट काढण्यात आलीय हे मात्र गुलदस्त्यात आहे. आगरकरऐवजी मुंबई टीममध्ये क्षेमल वायंगणकरची निवड करण्यात आली आहे. 6 डिसेंबरपासून मुंबई - सौराष्ट्रदरम्यानची मॅच खेळवली जाणार आहे. दरम्यान, या लढतीसाठी फास्ट बॉलर झहीर खानचाही मुंबई टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी झहीर खानला रणजी क्रिकेटमध्ये खेळू आपला फिटनेस सिध्द करायचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close