S M L

एव्हरग्रीन 'गाईड' हरपला

04 डिसेंबरएव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या राज-दिलीप-देव या गोल्डन त्रिकुटातला देव आनंद नावाचा तारा आज निखळला. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचं काल रात्री लंडनमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं. अनेक संगीतप्रधान सिनेमातल्या त्यांच्या भूमिका तर गाजल्याच..पण त्याचबरोबर एका पिढीचा फॅशन आयकॉन बनण्याचं भाग्यही त्यांना मिळालं आणि ते त्यांनी अभिमानानं मिरवलंही...ग्रेगरी पेक या हॉलिवूड अभिनेत्याचा जबरदस्त प्रभाव देव यांच्यावर होता, किंबहुना त्याची स्टाईलही त्यांनी घेतली होती. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी आणि बिनधास्त वावर..देव नावाच्या व्यक्तित्त्वाची ही जादू आता कधीही दिसणार नाही. लंडनंध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देव आनंद यांची कारकिर्द1946 - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात1947 - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन2001 - साली पद्मभूषण पुरस्कार 2002 - साली दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 - भारतीय सिनेमातील योगदानाबद्दलअमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता. 2000 - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता. देव आनंद यांचे प्रसिद्ध सिनेमेजिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह..

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2011 04:53 PM IST

एव्हरग्रीन 'गाईड' हरपला

04 डिसेंबर

एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या राज-दिलीप-देव या गोल्डन त्रिकुटातला देव आनंद नावाचा तारा आज निखळला. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचं काल रात्री लंडनमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं. अनेक संगीतप्रधान सिनेमातल्या त्यांच्या भूमिका तर गाजल्याच..पण त्याचबरोबर एका पिढीचा फॅशन आयकॉन बनण्याचं भाग्यही त्यांना मिळालं आणि ते त्यांनी अभिमानानं मिरवलंही...ग्रेगरी पेक या हॉलिवूड अभिनेत्याचा जबरदस्त प्रभाव देव यांच्यावर होता, किंबहुना त्याची स्टाईलही त्यांनी घेतली होती. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी आणि बिनधास्त वावर..देव नावाच्या व्यक्तित्त्वाची ही जादू आता कधीही दिसणार नाही. लंडनंध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

देव आनंद यांची कारकिर्द1946 - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात1947 - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन2001 - साली पद्मभूषण पुरस्कार 2002 - साली दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 - भारतीय सिनेमातील योगदानाबद्दलअमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता. 2000 - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता.

देव आनंद यांचे प्रसिद्ध सिनेमेजिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close