S M L

पेडर रोडचा फ्लायओव्हर झालाच पाहिजे - राज ठाकरे

6 डिसेंबरपेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर, आज राज ठाकरेंनी त्यावर टीका केली. शहराची गरज असेल, पेडर रोड फ्लायओव्हर झालाच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. पेडर रोडचे नागरिक असे कोण लागून गेले, जे फ्लायओव्हरला विरोध करताहेत. सरकार त्यांच्याशी का चर्चा करतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पेडर रोडचा फ्लायओव्हर झाला नाही, राज्यात कुठंही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी सरकारला दिला. त्याचबरोबर राज ठाकरेंनी स्कायवॉकवरही टीका केली. स्कायवॉकची गरज नसताना ते बांधले, मेट्रोच्या कामासाठी लोकांची घरं तोडली, दुकानं तोडली, त्यांनी विरोध केला नाही. ती जर शहरांची गरज असेल, तर त्या गोष्टी करायलाच हव्यात. पेडर रोडचा फ्लायओव्हर झाला नाही, तर मुंबईत प्रत्येक फ्लायओव्हर होताना स्थानिकांना विचारात घ्यावे लागेल, अशी मागणीही त्यांनी सरकारकडं केली, त्यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, ते बघू असंही राज ठाकरे म्हणाले.पेडर रोडवरील फ्लायओवर अजून रद्द केलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. जनसुनावणी सुरु आहे आणि जनतेचा आदर करुन निर्णय घेवू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पेडर रोड फ्लायओव्हर रद्द केला तर मुंबईत एकही फ्लायओव्हर होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं सरकारला याआधीच दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2011 12:28 PM IST

पेडर रोडचा फ्लायओव्हर झालाच पाहिजे - राज ठाकरे

6 डिसेंबर

पेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर, आज राज ठाकरेंनी त्यावर टीका केली. शहराची गरज असेल, पेडर रोड फ्लायओव्हर झालाच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. पेडर रोडचे नागरिक असे कोण लागून गेले, जे फ्लायओव्हरला विरोध करताहेत. सरकार त्यांच्याशी का चर्चा करतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पेडर रोडचा फ्लायओव्हर झाला नाही, राज्यात कुठंही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी सरकारला दिला. त्याचबरोबर राज ठाकरेंनी स्कायवॉकवरही टीका केली. स्कायवॉकची गरज नसताना ते बांधले, मेट्रोच्या कामासाठी लोकांची घरं तोडली, दुकानं तोडली, त्यांनी विरोध केला नाही. ती जर शहरांची गरज असेल, तर त्या गोष्टी करायलाच हव्यात. पेडर रोडचा फ्लायओव्हर झाला नाही, तर मुंबईत प्रत्येक फ्लायओव्हर होताना स्थानिकांना विचारात घ्यावे लागेल, अशी मागणीही त्यांनी सरकारकडं केली, त्यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, ते बघू असंही राज ठाकरे म्हणाले.

पेडर रोडवरील फ्लायओवर अजून रद्द केलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. जनसुनावणी सुरु आहे आणि जनतेचा आदर करुन निर्णय घेवू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पेडर रोड फ्लायओव्हर रद्द केला तर मुंबईत एकही फ्लायओव्हर होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं सरकारला याआधीच दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close