S M L

अण्णांची शरद पवारांवर ब्लॉगमधून टीका

6 डिसेंबरअण्णा हजारेंनी आपल्या ब्लॉगमधून शरद पवारांवर कडाडून टीका केलीय. अण्णांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्यानंतर, त्यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थनही त्यांच्या ब्लॉगमध्ये केलंय. हरविंदर सिंग या तरुणाने पवारांवर हल्ला केल्यानंतर आपण पवारांबद्दल कठोर शब्द वापरले होते. एखाद्याला कठोर शब्द वापरणे ही गांधीवादानुसार हिंसा आहे. त्यामुळे ही हिंसा माझ्याकडून झाली आहे. पण अशी हिंसा करणे मला दोष वाटत नसल्याचं अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय. लोक माझी गांधींशी तुलना करतात. पण त्यांना आपण आपली गांधींच्या पायाजवळ बसण्याचीही पात्रता नसल्याचं सांगतो. असंही अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. महात्मा गांधी यांच्या प्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाही मानतो. पण मी कधी हातात तलवार घेणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने हिंसा करणार नाही. फक्त कठोर शब्दातून एखाद्यावर टीका करणे ही हिंसा आपण केल्याचं योग्य असल्याचंही अण्णा म्हणतात. शरद पवारांना तरुणाने थप्पड का मारली याचाही विचार व्हावा असही अण्णा आपल्या ब्लॉग मध्ये लिहितात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2011 12:42 PM IST

अण्णांची शरद पवारांवर ब्लॉगमधून टीका

6 डिसेंबर

अण्णा हजारेंनी आपल्या ब्लॉगमधून शरद पवारांवर कडाडून टीका केलीय. अण्णांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्यानंतर, त्यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थनही त्यांच्या ब्लॉगमध्ये केलंय. हरविंदर सिंग या तरुणाने पवारांवर हल्ला केल्यानंतर आपण पवारांबद्दल कठोर शब्द वापरले होते. एखाद्याला कठोर शब्द वापरणे ही गांधीवादानुसार हिंसा आहे. त्यामुळे ही हिंसा माझ्याकडून झाली आहे. पण अशी हिंसा करणे मला दोष वाटत नसल्याचं अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय. लोक माझी गांधींशी तुलना करतात. पण त्यांना आपण आपली गांधींच्या पायाजवळ बसण्याचीही पात्रता नसल्याचं सांगतो. असंही अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. महात्मा गांधी यांच्या प्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाही मानतो. पण मी कधी हातात तलवार घेणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने हिंसा करणार नाही. फक्त कठोर शब्दातून एखाद्यावर टीका करणे ही हिंसा आपण केल्याचं योग्य असल्याचंही अण्णा म्हणतात. शरद पवारांना तरुणाने थप्पड का मारली याचाही विचार व्हावा असही अण्णा आपल्या ब्लॉग मध्ये लिहितात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2011 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close