S M L

वेंगुर्ल्याची घटना म्हणजे शिवसेनेचंच षड्‌यंत्र - नारायण राणे

6 डिसेंबरनगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शहरात काल रात्री उशिरा तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसमधल्या दोन गटांमधल्या वादात नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतल्यानं या वादाला हिंसक वळण लागलं. काँग्रेसचे युवा नेते विलास गावडे यांच्या घरात नितेश राणेंचे कार्यकर्ते घुसले. त्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचं कळतंय. विलास गावडे काँग्रेसचे असूनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहकार्य करतात, याचा जाब विचारण्यासाठी गावडे यांच्या घरात नितेश राणे यांचे कार्यकर्ते घुसले असल्याचं कळतंय. त्यानंतर नितेश राणे हे कॉंग्रेस कार्यालयात असतांना संतप्त नागरिकांच्या जमावाने काँग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावात काही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घुसल्याने तणाव वाढला. यानंतर तिथं खुद्द नारायण राणे दाखल झाले, त्यानंतर तणाव वाढला आणि मोठ्याप्रमाणात इथं तोडफोड झाली. तसंच मारहाणीचे प्रकारही झाले आहे. त्यानंतर शिवसेनेचे आमदार परशुराम उपरकर यांच्यावर शिवसेना शाखेत हल्ला करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांना रोखण्यासाठी उपरकर यांच्या अंगरक्षकांनी रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. यात राणेंचा एक कार्यकर्ता जखमी झालाय. वेंगुर्ला शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. सध्या इथं तणावपूर्व शांतता आहे.आज संपूर्ण वेंगुर्ले शहर बंद आहे. दरम्यान दोनही बाजूने पोलिस तक्रार दाखल झाल्यात...आर आर पाटील यांनी आज वेगुर्ल्याला भेट दिली..आणि वेंगुर्लेच्या घटनेची आय जीं मार्फत चौकशी करु आणि निवडणूक आयोगाला स्वतंत्र निरीक्षक नेमण्याची मागणी करु, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2011 01:05 PM IST

वेंगुर्ल्याची घटना म्हणजे शिवसेनेचंच षड्‌यंत्र - नारायण राणे

6 डिसेंबर

नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शहरात काल रात्री उशिरा तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसमधल्या दोन गटांमधल्या वादात नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतल्यानं या वादाला हिंसक वळण लागलं. काँग्रेसचे युवा नेते विलास गावडे यांच्या घरात नितेश राणेंचे कार्यकर्ते घुसले. त्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचं कळतंय. विलास गावडे काँग्रेसचे असूनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहकार्य करतात, याचा जाब विचारण्यासाठी गावडे यांच्या घरात नितेश राणे यांचे कार्यकर्ते घुसले असल्याचं कळतंय. त्यानंतर नितेश राणे हे कॉंग्रेस कार्यालयात असतांना संतप्त नागरिकांच्या जमावाने काँग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावात काही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घुसल्याने तणाव वाढला. यानंतर तिथं खुद्द नारायण राणे दाखल झाले, त्यानंतर तणाव वाढला आणि मोठ्याप्रमाणात इथं तोडफोड झाली. तसंच मारहाणीचे प्रकारही झाले आहे. त्यानंतर शिवसेनेचे आमदार परशुराम उपरकर यांच्यावर शिवसेना शाखेत हल्ला करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांना रोखण्यासाठी उपरकर यांच्या अंगरक्षकांनी रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. यात राणेंचा एक कार्यकर्ता जखमी झालाय. वेंगुर्ला शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. सध्या इथं तणावपूर्व शांतता आहे.आज संपूर्ण वेंगुर्ले शहर बंद आहे. दरम्यान दोनही बाजूने पोलिस तक्रार दाखल झाल्यात...आर आर पाटील यांनी आज वेगुर्ल्याला भेट दिली..आणि वेंगुर्लेच्या घटनेची आय जीं मार्फत चौकशी करु आणि निवडणूक आयोगाला स्वतंत्र निरीक्षक नेमण्याची मागणी करु, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close