S M L

सायमंड्सची आजपासून बिग बॉसमध्ये नवी इनिंग

मिहिर त्रिवेदी, मुंबई. 07 डिसेंबरभारतीय क्रिकेट फॅन्ससाठी अँड्र्यू सायमंड्स हे नाव नवीन नाही. पण आता तो भारतात लोकांसमोर येणार आहे एका नव्या अवतारात... सायमंड्स आता आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर अँड्रयू सायमंड्सची घणाघाती बॅटिंग बघणं हे तसं मनोरंजकच असायचं. पण आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पुढे सरसावलाय. सायमंड्सला हे नवीन काय सुचलं असं वाटत असेल यावर सायमंड्स म्हणतो, बिग बॉस हे नवं आव्हान आहे. मला भारतातली संस्कृती आवडते. बर्‍याचदा मी इथं आलोय. मला खात्री आहे बिग बॉसचं घरंही मला आवडेल. आता सायमंड्स क्रिकेटचे नाही तर बिग बॉसचे नियम पाळणार आहे. आणि यातला एक नियम आहे घरात हिंदी बोलण्याचा. पण सायमंड्स त्यासाठीही तयार आहे. यावर सायमंड्स म्हणतो, मला भाषा अजून तितकीशी येत नाही. पण हिंदी मला समजतं. शो मध्ये हळूहळू मी बोलायलाही शिकेन. बिग बॉसचे होस्ट सलमान खान आणि संजय दत्त यांच्याविषयी मात्र सायमंड्सला अजून फारशी माहिती नाही. सायमंड्स म्हणतो, इथं येण्यापूर्वी मी त्यांच्याविषयी थोडी माहिती घेतलीय. त्यातल्या एकाने कॉमेडी फिल्म केलीय ना ?बिग बॉसच्या घरात त्याचं पदार्पण बुधवारी होणार आहे. आणि इथली त्याची इनिंग बघायला सगळेच उत्सुक आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 01:52 PM IST

सायमंड्सची आजपासून बिग बॉसमध्ये नवी इनिंग

मिहिर त्रिवेदी, मुंबई.

07 डिसेंबर

भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी अँड्र्यू सायमंड्स हे नाव नवीन नाही. पण आता तो भारतात लोकांसमोर येणार आहे एका नव्या अवतारात... सायमंड्स आता आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

क्रिकेटच्या मैदानावर अँड्रयू सायमंड्सची घणाघाती बॅटिंग बघणं हे तसं मनोरंजकच असायचं. पण आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पुढे सरसावलाय. सायमंड्सला हे नवीन काय सुचलं असं वाटत असेल यावर

सायमंड्स म्हणतो, बिग बॉस हे नवं आव्हान आहे. मला भारतातली संस्कृती आवडते. बर्‍याचदा मी इथं आलोय. मला खात्री आहे बिग बॉसचं घरंही मला आवडेल. आता सायमंड्स क्रिकेटचे नाही तर बिग बॉसचे नियम पाळणार आहे. आणि यातला एक नियम आहे घरात हिंदी बोलण्याचा. पण सायमंड्स त्यासाठीही तयार आहे.

यावर सायमंड्स म्हणतो, मला भाषा अजून तितकीशी येत नाही. पण हिंदी मला समजतं. शो मध्ये हळूहळू मी बोलायलाही शिकेन. बिग बॉसचे होस्ट सलमान खान आणि संजय दत्त यांच्याविषयी मात्र सायमंड्सला अजून फारशी माहिती नाही.

सायमंड्स म्हणतो, इथं येण्यापूर्वी मी त्यांच्याविषयी थोडी माहिती घेतलीय. त्यातल्या एकाने कॉमेडी फिल्म केलीय ना ?

बिग बॉसच्या घरात त्याचं पदार्पण बुधवारी होणार आहे. आणि इथली त्याची इनिंग बघायला सगळेच उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close