S M L

कानपूरमधली तिसरी वनडे चुरशीची होणार

19 नोव्हेंबरभारताविरुद्ध सलग दोन वनडेत पराभव पत्करावा लागल्यानं इंग्लंड टीमसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. आता कानपूरला होणा-या तिस-या वन डेमध्ये सर्वात जास्त दबाव आहे तो इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसनवर. तर दुसरीकडे धोणीच्या यंग ब्रिगेडचं लक्ष असणार ते सीरिजमध्ये 3-0 अशी आघाडी घेण्याकडे. इंदूर वन डेमध्ये भारताची बॅटिंग ऑर्डर कोसळली होती. रोहित शर्माला 4थ्या स्थानावर पाठवण्याचा निर्णय फसला होता. त्यावेळी भारताची स्थिती 29 रन्सवर 3 विकेट अशी होती. इंग्लंडला जिंकण्याची चांगली संधी होती. पण युवराज सिंग आणि गौतम गंभीरचा विचार काही वेगळाच होता. युवराजनं या सीरिजमधली त्याची सगल दुसरी सेंच्युरी मारत भारतीय सिलेक्टर्सना टेस्ट टीमसाठी त्याचा विचार करायला लावलंय. तर युसुफ पठाणच्या जबरदस्त हाफ सेंच्युरीमुळे सिलेक्टर्सना पर्याय उपलब्ध झाले आहेत. इंग्लंडच्या मागच्या दोन वन डेमधील प्रदर्शनावर इंग्लंडचा माजी बॉलर डॅरेन घॉग नाराज आहे. त्याने सारा दोष बॅटिंग ऑर्डरला दिला आहे. इंग्लंडच्या बॅटिंगची जी अवस्था झाली त्याचं फारसं आश्चर्य वाटायला नको असं त्याचं म्हणणं आहे. कदाचित अ‍ॅण्ड्र्यू फ्लिंटॉफला वरच्या स्थानावर बॅटिंगला पाठवलं असतं तर इंग्लंडच्या धावसंख्येचा वेग वाढला असता. पण भारतीय स्पिन बॉलिंगसमोर इंग्लंडची बॅटिंग पुन्हा एकदा फ्लॉप ठरली.दोन सलग पराभवांनंतर इंग्लंडची टीम आता बॅकफुटवर गेली आहे.आणि या सीरिजमध्ये पुनरागमन करण्यासाठी इंग्लंड टीमला सगळ्याच क्षेत्रात भारताच्या वरचढ कामगिरी करावी लागणार आहे. इंग्लंडवर मिळवलेल्या सलग दोन दणदणीत विजयांनंतर भारताला ही सीरिज जिंकण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे कानपूरमध्ये 20 तारखेला होणारी तिसरी वनडे चुरशीची होणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close