S M L

नारायण राणेंविरोधात राहुल गांधींकडे तक्रार

08 डिसेंबरवेंगुर्ल्यात झालेला राडा प्रकरणावरून नारायण राणे सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. राणेंचे पक्षातलेच विरोधक आमदार विजय सावंत आणि पुष्पसेन सावंत आणि कोकणातल्या इतर पदाधिकार्‍यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेऊन राणेंविरोधात तक्रार केली. राणेंमुळे पक्षाची बदनामी होत असून जुन्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय अशी तक्रार त्यांनी राहुल गांधींकडे केली. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिल्याचं या नेत्यांनी सांगितलं. दरम्यान, आपणही रात्री दिल्लीला जाणार असल्याचे नारायण राणे यांनी मिरज स्पष्ट केलं. उद्या सोनिया गांधींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राणे शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा दिल्लीत येणार आहेत. या भेटीत ते पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात सर्व पक्षांची महायुती झाली. रा़ष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनता दलाने सिंधुदुर्गातल्या नगरपालिका निवडणुकीसाठी युती केलीय. आणि या युतीने राणेंविरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोडून कोणालाही मतदान करा, असं आवाहनच या युतीकडून करण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2011 10:07 AM IST

नारायण राणेंविरोधात राहुल गांधींकडे तक्रार

08 डिसेंबर

वेंगुर्ल्यात झालेला राडा प्रकरणावरून नारायण राणे सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. राणेंचे पक्षातलेच विरोधक आमदार विजय सावंत आणि पुष्पसेन सावंत आणि कोकणातल्या इतर पदाधिकार्‍यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेऊन राणेंविरोधात तक्रार केली. राणेंमुळे पक्षाची बदनामी होत असून जुन्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय अशी तक्रार त्यांनी राहुल गांधींकडे केली. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिल्याचं या नेत्यांनी सांगितलं.

दरम्यान, आपणही रात्री दिल्लीला जाणार असल्याचे नारायण राणे यांनी मिरज स्पष्ट केलं. उद्या सोनिया गांधींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राणे शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा दिल्लीत येणार आहेत. या भेटीत ते पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी घेण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात सर्व पक्षांची महायुती झाली. रा़ष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनता दलाने सिंधुदुर्गातल्या नगरपालिका निवडणुकीसाठी युती केलीय. आणि या युतीने राणेंविरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोडून कोणालाही मतदान करा, असं आवाहनच या युतीकडून करण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close