S M L

'लेडिज व्हर्सेस रिकी बेहल' उद्या मैदानात

08 डिसेंबरवीकेण्ड जवळ आला आहे आणि यावेळी सिनेमांची संख्या तशी भरपूर आहे. सिनेमांचे भरपूर ऑप्शन्स प्रेक्षकांना आहेत. बँड बाजा बारात सिनेमानंतर आता रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांच्यातला सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. लेडीज व्हर्सेस रिकी बहल हा सिनेमा रिलीज होतोय. अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा रिकी इशिकाच्या प्रेमात पडतो. आणि हे पाहायला मिळतं विनोदाच्या अंगानं. यशराज बॅनरच्या या सिनेमात पुन्हा एकदा अनुष्का-रणवीरची केमिस्ट्री आपल्याला पाहता येईल. सलीम-सुलेमानचं संगीत आहे. यावेळी मराठी सिनेमांचाही ऑप्शन आहे. मकरंद अनासपुरेचं पहिलं दिग्दर्शन आणि सयाजी शिंदेसोबत निर्मिती असलेला डँबिस रिलीज होतोय. घर आणि करिअर यात अडकलेले पालक आपल्या छोट्या मुलाकडेच कसं दुर्लक्ष करतात, ही सिनेमाची संकल्पना आहे. एकमेकांतली हरवलेली नाती, विसरलेला संवाद यावर सिनेमा फोकस करतो. लोकेश गुप्ते, डॉ. प्रज्ञा शास्त्री आणि मकरंद अनासपुरे यांच्या मुख्य भूमिका आहे. छोट्या मुलाची भूमिका शुभंकर अत्रेनी साकारली आहे. मराठीत एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमाही रिलीज होतोय. तो म्हणजे प्रतिबिंब. सोनाली कुलकर्णी आणि अंकुश चौधरीची मुख्य भूमिका आहे. गिरीश मोहितेचं दिग्दर्शन आहे. तसेच पारंबी या मराठी सिनेमाचाही पर्याय आहे. शहरात शिकलेला तरूण गावात जाऊन सुधारणा करतो, यावरच हा सिनेमा आहे. मुख्य भूमिकेत भूषण प्रधान आहे. आनंदवनातही या सिनेमाचं शूटिंग झालंय. तर हॉलिवूडचा द न्यू इयर्स इव्ह पाहता येईल. 'प्रिटी वूमन' आणि 'वॅलेंटाईन्स डे' सारखे क्लासिक सिनेमे देणारा दिग्दर्शक गॅरी मार्शल याचा 'द न्यू इयर्स इव्ह' हा नवा सिनेमा. ही एक रोमँटीक कॉमेडी असून हॉलिवूडचे जाने-माने चेहरे यात काम करताना दिसणार आहेत, त्यात हॅली बेरी, जेसिका बेल, रॉबर्ट दि निरो अशांच्या भूमिका आहेत.नावाप्रमाणेच एका न्यू इयरच्या रात्री न्यूयॉर्क शहरात राहणार्‍या काही लोकांची ही कथा आहे. त्या एका रात्री त्यांच्या आयुष्यात कसा घटना घडतात आणि त्यामुळे त्यांच्यात कसा बदल होतो...ही रोमांचक..भावनिक गंुतागुंत यात दाखवली आहे. एकूणच या वीकेण्डला सिनेमाचे भरपूर ऑप्शन आहेत. कुठला सिनेमा हिट होतोय आणि कुठला फ्लॉप हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2011 05:33 PM IST

'लेडिज व्हर्सेस रिकी बेहल' उद्या मैदानात

08 डिसेंबर

वीकेण्ड जवळ आला आहे आणि यावेळी सिनेमांची संख्या तशी भरपूर आहे. सिनेमांचे भरपूर ऑप्शन्स प्रेक्षकांना आहेत. बँड बाजा बारात सिनेमानंतर आता रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांच्यातला सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. लेडीज व्हर्सेस रिकी बहल हा सिनेमा रिलीज होतोय. अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा रिकी इशिकाच्या प्रेमात पडतो. आणि हे पाहायला मिळतं विनोदाच्या अंगानं. यशराज बॅनरच्या या सिनेमात पुन्हा एकदा अनुष्का-रणवीरची केमिस्ट्री आपल्याला पाहता येईल. सलीम-सुलेमानचं संगीत आहे.

यावेळी मराठी सिनेमांचाही ऑप्शन आहे. मकरंद अनासपुरेचं पहिलं दिग्दर्शन आणि सयाजी शिंदेसोबत निर्मिती असलेला डँबिस रिलीज होतोय. घर आणि करिअर यात अडकलेले पालक आपल्या छोट्या मुलाकडेच कसं दुर्लक्ष करतात, ही सिनेमाची संकल्पना आहे. एकमेकांतली हरवलेली नाती, विसरलेला संवाद यावर सिनेमा फोकस करतो. लोकेश गुप्ते, डॉ. प्रज्ञा शास्त्री आणि मकरंद अनासपुरे यांच्या मुख्य भूमिका आहे. छोट्या मुलाची भूमिका शुभंकर अत्रेनी साकारली आहे.

मराठीत एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमाही रिलीज होतोय. तो म्हणजे प्रतिबिंब. सोनाली कुलकर्णी आणि अंकुश चौधरीची मुख्य भूमिका आहे. गिरीश मोहितेचं दिग्दर्शन आहे. तसेच पारंबी या मराठी सिनेमाचाही पर्याय आहे. शहरात शिकलेला तरूण गावात जाऊन सुधारणा करतो, यावरच हा सिनेमा आहे. मुख्य भूमिकेत भूषण प्रधान आहे. आनंदवनातही या सिनेमाचं शूटिंग झालंय. तर हॉलिवूडचा द न्यू इयर्स इव्ह पाहता येईल. 'प्रिटी वूमन' आणि 'वॅलेंटाईन्स डे' सारखे क्लासिक सिनेमे देणारा दिग्दर्शक गॅरी मार्शल याचा 'द न्यू इयर्स इव्ह' हा नवा सिनेमा. ही एक रोमँटीक कॉमेडी असून हॉलिवूडचे जाने-माने चेहरे यात काम करताना दिसणार आहेत, त्यात हॅली बेरी, जेसिका बेल, रॉबर्ट दि निरो अशांच्या भूमिका आहेत.

नावाप्रमाणेच एका न्यू इयरच्या रात्री न्यूयॉर्क शहरात राहणार्‍या काही लोकांची ही कथा आहे. त्या एका रात्री त्यांच्या आयुष्यात कसा घटना घडतात आणि त्यामुळे त्यांच्यात कसा बदल होतो...ही रोमांचक..भावनिक गंुतागुंत यात दाखवली आहे. एकूणच या वीकेण्डला सिनेमाचे भरपूर ऑप्शन आहेत. कुठला सिनेमा हिट होतोय आणि कुठला फ्लॉप हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close