S M L

डोपिंग प्रकरणी 8 ऍथलिट्सना क्लिन चीट

09 डिसेंबरगेल्या जुलै महिन्या, भारताचे आठ ऍथलिट्स डोपिंग प्रकरणी दोषी आढळले होते. पण या प्रकरणाची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय समितीने या ऍथलिट्सना क्लिन चिट दिली आहे. ऍथलिट्सकडून घेण्यात आलेलं प्रतिबंधीत द्रव्य हा एक अपघात होता. ते जाणीवपूर्वक घेतल गेलं नाही असं मत अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या संपूर्ण वादाची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एक सदस्यीय समिती नेमली होती. हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश मुकुल मुदगल हे समितीचे प्रमुख आहेत. डोपिंग प्रकरणी मनदीप कौर, अश्विनी आखुंजी, सिनी जोन्स, प्रियंका पनवर, जुआना मुरमू, तियाना मेरी, आणि सोनिया या आठ ऍथलिट्सना निलंबित करण्यात आलंं होतं. तसेच कोच युरी ओगोरोड्निक यांनाही पदावरून हटवण्यात आलं. पण आता क्लिन चीट मिळाल्यानं हे खेळाडू लंडंन ऑलिम्पिकसाठी उपलब्ध होण्याची शक्यताही वाढली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 11:34 AM IST

डोपिंग प्रकरणी 8 ऍथलिट्सना क्लिन चीट

09 डिसेंबर

गेल्या जुलै महिन्या, भारताचे आठ ऍथलिट्स डोपिंग प्रकरणी दोषी आढळले होते. पण या प्रकरणाची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय समितीने या ऍथलिट्सना क्लिन चिट दिली आहे. ऍथलिट्सकडून घेण्यात आलेलं प्रतिबंधीत द्रव्य हा एक अपघात होता. ते जाणीवपूर्वक घेतल गेलं नाही असं मत अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या संपूर्ण वादाची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एक सदस्यीय समिती नेमली होती. हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश मुकुल मुदगल हे समितीचे प्रमुख आहेत. डोपिंग प्रकरणी मनदीप कौर, अश्विनी आखुंजी, सिनी जोन्स, प्रियंका पनवर, जुआना मुरमू, तियाना मेरी, आणि सोनिया या आठ ऍथलिट्सना निलंबित करण्यात आलंं होतं. तसेच कोच युरी ओगोरोड्निक यांनाही पदावरून हटवण्यात आलं. पण आता क्लिन चीट मिळाल्यानं हे खेळाडू लंडंन ऑलिम्पिकसाठी उपलब्ध होण्याची शक्यताही वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close