S M L

अण्णांचे आंदोलन 'टाइम'च्या टॉप 10 मध्ये

09 डिसेंबरजन लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. 2011 मध्ये घडलेल्या,पहिल्या 10 मुख्य घटनांमध्ये अमेरिकेच्या प्रसिध्द टाइम मॅगझिनने अण्णांच्या आंदोलनाचा समावेश केला आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे भारत ढवळून निघाला असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे. या आंदोलनामुळे भारतीय मध्यमवर्गातली खदखद बाहेर पडल्याचे टाइम मॅगझिनने म्हटलं आहे. मागिल महिन्यात टाइमच्या फोटोग्राफरनी अण्णांचे फोटो सेशन केले होते. अण्णांच्या आंदोलन ज्यावेळी सुरु होते त्यावेळी विदेशातील अनेक नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग घेतला होता. देशातील तरुण वर्ग सर्वात मोठ्या प्रमाणावर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. खुद्द अण्णांनी आंदोलनाची शक्ती ही आजचा तरुण वर्ग आहे असं म्हटलं होतं. आता लोकपालसाठी पुन्हा एकदा अण्णांनी उपोषणास्त्र उपसले आहे. मात्र अण्णांच्या या कार्याची दखल घेतल्यामुळे महाराष्ट्राची नवी ओळख आता अटकेपार होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 11:56 AM IST

अण्णांचे आंदोलन 'टाइम'च्या टॉप 10 मध्ये

09 डिसेंबर

जन लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. 2011 मध्ये घडलेल्या,पहिल्या 10 मुख्य घटनांमध्ये अमेरिकेच्या प्रसिध्द टाइम मॅगझिनने अण्णांच्या आंदोलनाचा समावेश केला आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे भारत ढवळून निघाला असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे. या आंदोलनामुळे भारतीय मध्यमवर्गातली खदखद बाहेर पडल्याचे टाइम मॅगझिनने म्हटलं आहे. मागिल महिन्यात टाइमच्या फोटोग्राफरनी अण्णांचे फोटो सेशन केले होते. अण्णांच्या आंदोलन ज्यावेळी सुरु होते त्यावेळी विदेशातील अनेक नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग घेतला होता. देशातील तरुण वर्ग सर्वात मोठ्या प्रमाणावर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. खुद्द अण्णांनी आंदोलनाची शक्ती ही आजचा तरुण वर्ग आहे असं म्हटलं होतं. आता लोकपालसाठी पुन्हा एकदा अण्णांनी उपोषणास्त्र उपसले आहे. मात्र अण्णांच्या या कार्याची दखल घेतल्यामुळे महाराष्ट्राची नवी ओळख आता अटकेपार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close