S M L

अवैध खाणकाम प्रकरणी एस.एम.कृष्णांविरोधात गुन्हा दाखल

08 डिसेंबरकाँग्रेस पक्षाच्या मागे लागलेलं घोटाळ्यांचं शुक्लकाष्ठ संपण्याचं नाव दिसत नाही. काँग्रेसचे आणखी एका वरिष्ठ मंत्र्यांचे नाव एका मोठ्या घोटाळ्यात अडकलं आहे. खाणकाम परवाना घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक लोकायुक्तांनी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यात कर्नाटकचे दोन माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि एन. धरम सिंग यांचीही नावं आहेत. कर्नाटकचे 2000 सालापासूनच्या सर्व मुख्यमंत्र्यांना राज्यात सुरु असलेल्या अवैध खाणकामाबाबत माहिती होती. त्यामुळे त्यांची तपासणी व्हावी, अशी एक खाजगी याचिका दाखल करण्यात आली होती. पण माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनी याप्रकरणी कृष्णा यांना आधीच क्लीन चिट दिली होती. त्याचाच आधार घेत आपण निर्दोष असल्याचं कृष्णा म्हणत आहे. पण खाणकाम घोटाळ्यात आधीच हात भाजलेल्या भाजपसाठी चांगली संधी चालून आली आहे. काँग्रेस आता का गप्प बसलीय, असा सवाल भाजपने विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2011 06:01 PM IST

अवैध खाणकाम प्रकरणी एस.एम.कृष्णांविरोधात गुन्हा दाखल

08 डिसेंबर

काँग्रेस पक्षाच्या मागे लागलेलं घोटाळ्यांचं शुक्लकाष्ठ संपण्याचं नाव दिसत नाही. काँग्रेसचे आणखी एका वरिष्ठ मंत्र्यांचे नाव एका मोठ्या घोटाळ्यात अडकलं आहे. खाणकाम परवाना घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक लोकायुक्तांनी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यात कर्नाटकचे दोन माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि एन. धरम सिंग यांचीही नावं आहेत. कर्नाटकचे 2000 सालापासूनच्या सर्व मुख्यमंत्र्यांना राज्यात सुरु असलेल्या अवैध खाणकामाबाबत माहिती होती. त्यामुळे त्यांची तपासणी व्हावी, अशी एक खाजगी याचिका दाखल करण्यात आली होती. पण माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनी याप्रकरणी कृष्णा यांना आधीच क्लीन चिट दिली होती. त्याचाच आधार घेत आपण निर्दोष असल्याचं कृष्णा म्हणत आहे. पण खाणकाम घोटाळ्यात आधीच हात भाजलेल्या भाजपसाठी चांगली संधी चालून आली आहे. काँग्रेस आता का गप्प बसलीय, असा सवाल भाजपने विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close