S M L

कोल्हापुरात जातपडताळणी कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

09 डिसेंबरकोल्हापूर विभागीय जातपडताळणी कार्यालयामधल्या भोंगळ कारभाराविरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी कार्यालयामध्ये घुसून अधिकार्‍यांना धारेवर धरलं. त्याचबरोबर कार्यालयामधल्या एका अधिकार्‍याला धक्काबुक्की केली. कार्यालयामधल्या काही साहित्याचंही नुकसान झालं. वारंवार खेटे मारुनही विद्यार्थी, नोकरदार व्यक्तींनाही जातपडताळणीचा दाखला वेळेत मिळत नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय. यापुढे जातपडताळणी कार्यालयामध्ये विद्यार्थी किंवा नोकरादारांना वेळेत दाखले मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 03:56 PM IST

कोल्हापुरात जातपडताळणी कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

09 डिसेंबर

कोल्हापूर विभागीय जातपडताळणी कार्यालयामधल्या भोंगळ कारभाराविरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी कार्यालयामध्ये घुसून अधिकार्‍यांना धारेवर धरलं. त्याचबरोबर कार्यालयामधल्या एका अधिकार्‍याला धक्काबुक्की केली. कार्यालयामधल्या काही साहित्याचंही नुकसान झालं. वारंवार खेटे मारुनही विद्यार्थी, नोकरदार व्यक्तींनाही जातपडताळणीचा दाखला वेळेत मिळत नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय. यापुढे जातपडताळणी कार्यालयामध्ये विद्यार्थी किंवा नोकरादारांना वेळेत दाखले मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 03:56 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close