S M L

लावणीचा बेस शो येतोय 'ढोलकीच्या तालावर'

09 डिसेंबररमेश देव निर्मित ढोलकीच्या तालावर हा नवा डान्स रिऍलिटी शो येत्या 14 डिसेंबरपासून ई टीव्हीवर सुरू होत आहे. या शोद्वारे मराठमोळया लावणीची जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. जुगलबंदी रंगणार आहे 12 स्पर्धकांमध्ये आणि त्यातूनच निवडली जाईल महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी...या बारा स्पर्धकांमध्ये सोनाली खरे,आदिती सारंगधर, पूर्वा पवार अशा काही सेलिब्रिटींचा समावेश आहे. तर काहीजणींच्या कुटुंबातचं लावणीची परंपरा आहे. विशेष म्हणजे जर्मनहून आलेली सुझॅन बर्नेटदेखील या स्पर्धेत ढोलकीच्या तालावर थिरकताना दिसणार आहे.आणि या शोचे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मॉडेल अभिनेत्री अमृता पत्की आणि विश्वास पाटील जज म्हणून काम पाहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 04:12 PM IST

लावणीचा बेस शो येतोय 'ढोलकीच्या तालावर'

09 डिसेंबर

रमेश देव निर्मित ढोलकीच्या तालावर हा नवा डान्स रिऍलिटी शो येत्या 14 डिसेंबरपासून ई टीव्हीवर सुरू होत आहे. या शोद्वारे मराठमोळया लावणीची जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. जुगलबंदी रंगणार आहे 12 स्पर्धकांमध्ये आणि त्यातूनच निवडली जाईल महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी...या बारा स्पर्धकांमध्ये सोनाली खरे,आदिती सारंगधर, पूर्वा पवार अशा काही सेलिब्रिटींचा समावेश आहे. तर काहीजणींच्या कुटुंबातचं लावणीची परंपरा आहे. विशेष म्हणजे जर्मनहून आलेली सुझॅन बर्नेटदेखील या स्पर्धेत ढोलकीच्या तालावर थिरकताना दिसणार आहे.आणि या शोचे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मॉडेल अभिनेत्री अमृता पत्की आणि विश्वास पाटील जज म्हणून काम पाहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close