S M L

ठाण्याच्या रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती

09 डिसेंबरठाण्याच्या रेल्वे स्टेशनमध्ये आज पहाटे एका महिलेनं मुलीला जन्म दिला आहे. निर्मला कापसे ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी तिच्या माहेरी सोलापूरला जायला निघली होती. पण स्टेशनवरच पहाटे तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तातडीची काहीही व्यवस्था स्टेशनवर उपलब्ध नव्हती, त्यामुळे निर्मलाची प्रसूती ठाण्याच्या स्टेशनवरच झाली. सुदैवाने कुठलीही इमर्जन्सी झाली नाही. बाळ आणि बाळंतीण दोंघंही सुखरूप आहेत. त्यांना आता ठाण्याच्या सायन्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण अशा परिस्थितीत स्त्रियांनी प्रवासाचा धोका पत्करू नये असं सायन्ना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 04:19 PM IST

ठाण्याच्या रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती

09 डिसेंबर

ठाण्याच्या रेल्वे स्टेशनमध्ये आज पहाटे एका महिलेनं मुलीला जन्म दिला आहे. निर्मला कापसे ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी तिच्या माहेरी सोलापूरला जायला निघली होती. पण स्टेशनवरच पहाटे तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तातडीची काहीही व्यवस्था स्टेशनवर उपलब्ध नव्हती, त्यामुळे निर्मलाची प्रसूती ठाण्याच्या स्टेशनवरच झाली. सुदैवाने कुठलीही इमर्जन्सी झाली नाही. बाळ आणि बाळंतीण दोंघंही सुखरूप आहेत. त्यांना आता ठाण्याच्या सायन्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण अशा परिस्थितीत स्त्रियांनी प्रवासाचा धोका पत्करू नये असं सायन्ना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close