S M L

सदाबहार देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार

11 डिसेंबरएव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या एका पिढीचे फॅशन आयकॉन बनलेल्या अभिनेते देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचे 3 डिसेंबरला रात्री लंडनमध्ये हृदयविकाराने निधन झालं होतं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं.अनेक संगीतप्रधान सिनेमांतल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आज संध्याकाळी त्यांच्यावर लंडनमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2011 09:22 AM IST

सदाबहार देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार

11 डिसेंबर

एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या एका पिढीचे फॅशन आयकॉन बनलेल्या अभिनेते देव आनंद यांच्यावर आज लंडनमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या देव आनंद यांचे 3 डिसेंबरला रात्री लंडनमध्ये हृदयविकाराने निधन झालं होतं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं.अनेक संगीतप्रधान सिनेमांतल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आज संध्याकाळी त्यांच्यावर लंडनमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close