S M L

अण्णा इम्पॅक्ट; पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

10 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा लढा देण्याची घोषणा करत आज दिल्ली गाठली उद्या स्थायी समितीचा निषेध करण्यासाठी उद्या अण्णा एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. तर येणार्‍या 27 तारखेपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अण्णांनी केलीय. अण्णांच्या इशार्‍यानंतर अखेर सरकारला जाग आली. लोकपालच्या मुद्द्यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. त्याचबरोबर यूपीएतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्नेहभोजनासाठीही आमंत्रित केलं आहे. तर बुधवारी पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. अण्णांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर आता सरकारला जाग आलीय. लोकपालच्या मुद्द्यावर आता सरकार चर्चा करणार आहे. लोकपालच्या मुद्द्यावर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक- मंगळवारी यूपीएच्या घटक पक्षांची बैठक- पंतप्रधानांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली- लोकपाल विधेयक 19 ते 22 डिसेंबरदरम्यान संसदेत मांडण्याचा सरकारचा विचार- अण्णांच्या आंदोलनाच्या इशार्‍यामुळे सरकारवर दबाव- चर्चेत मित्रपक्ष आणि विरोधक असावेत, ही सरकारची अपेक्षा- कनिष्ठ नोकरशाही आणि पंतप्रधान पद काही अटींवर लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2011 04:09 PM IST

अण्णा इम्पॅक्ट; पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

10 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा लढा देण्याची घोषणा करत आज दिल्ली गाठली उद्या स्थायी समितीचा निषेध करण्यासाठी उद्या अण्णा एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. तर येणार्‍या 27 तारखेपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अण्णांनी केलीय. अण्णांच्या इशार्‍यानंतर अखेर सरकारला जाग आली. लोकपालच्या मुद्द्यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. त्याचबरोबर यूपीएतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्नेहभोजनासाठीही आमंत्रित केलं आहे. तर बुधवारी पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. अण्णांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर आता सरकारला जाग आलीय. लोकपालच्या मुद्द्यावर आता सरकार चर्चा करणार आहे.

लोकपालच्या मुद्द्यावर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक

- मंगळवारी यूपीएच्या घटक पक्षांची बैठक- पंतप्रधानांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली- लोकपाल विधेयक 19 ते 22 डिसेंबरदरम्यान संसदेत मांडण्याचा सरकारचा विचार- अण्णांच्या आंदोलनाच्या इशार्‍यामुळे सरकारवर दबाव- चर्चेत मित्रपक्ष आणि विरोधक असावेत, ही सरकारची अपेक्षा- कनिष्ठ नोकरशाही आणि पंतप्रधान पद काही अटींवर लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2011 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close