S M L

नगरपालिका निवडणुकीत सरासरी 65 टक्के मतदान

11 डिसेंबरराज्यातल्या 168 नगरपालिकांसाठी आज मतदान झालं. बहुतांश ठिकाणी शांतेतत मतदान झालं आणि वेंगुर्ला वगळता इतर सर्व ठिकाणी राज्यात सगळीकडे चांगले मतदान झालं आहे. आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली, असं राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. यावेळी मतदारांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. दुपारी थोडी गर्दी कमी झाली. मात्र त्यानंतर मतदारांनी जोरदार उत्साह दाखवत मतदानाची टक्केवारी थेट 60 टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 02:52 PM IST

नगरपालिका निवडणुकीत सरासरी 65 टक्के मतदान

11 डिसेंबर

राज्यातल्या 168 नगरपालिकांसाठी आज मतदान झालं. बहुतांश ठिकाणी शांतेतत मतदान झालं आणि वेंगुर्ला वगळता इतर सर्व ठिकाणी राज्यात सगळीकडे चांगले मतदान झालं आहे. आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली, असं राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. यावेळी मतदारांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. दुपारी थोडी गर्दी कमी झाली. मात्र त्यानंतर मतदारांनी जोरदार उत्साह दाखवत मतदानाची टक्केवारी थेट 60 टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close