S M L

भारताने उडवला विंडीजचा 34 रन्सने धुव्वा

11 डिसेंबरवेस्ट इंडीज विरुद्धची पाचवी आणि शेवटची वन डेही भारतीय टीमने जिंकलीय आणि सीरिजमध्ये 4-1 असा विजय मिळवला. चेन्नईत झालेली पाचवी वन डे टीमने 34 रन्सनी जिंकली. पहिली बॅटिंग करत भारतीय टीमने विंडीजसमोर 268 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण आधीच्या मॅचेस प्रमाणेच त्यांची सुरुवात पुन्हा खराब झाली. पहिल्या पाच विकेट 78 रनमध्येच गेल्या. पण रामदिन आणि पोलार्ड यांनी 89 रनची पार्टनरशिप केली. पोलार्डने पहिली वन डे सेंच्युरी ठोकली. आणि तो होता तोपर्यंत विंडीजला विजयाची आशा होती. पण तो 119 रन करुन आऊट झाला. आणि विंडीजचं आव्हानही संपलं. त्याने अकरा सिक्स लगावले. भारतातर्फे रवी जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर पहिली बॅटिंग करताना भारतीय टीमने 267 रन केले ते मनोज तिवारीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेंच्युरीच्या जोरावर. त्याने 107 तर विराट कोहलीने 80 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 04:39 PM IST

भारताने उडवला विंडीजचा 34 रन्सने धुव्वा

11 डिसेंबर

वेस्ट इंडीज विरुद्धची पाचवी आणि शेवटची वन डेही भारतीय टीमने जिंकलीय आणि सीरिजमध्ये 4-1 असा विजय मिळवला. चेन्नईत झालेली पाचवी वन डे टीमने 34 रन्सनी जिंकली. पहिली बॅटिंग करत भारतीय टीमने विंडीजसमोर 268 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण आधीच्या मॅचेस प्रमाणेच त्यांची सुरुवात पुन्हा खराब झाली. पहिल्या पाच विकेट 78 रनमध्येच गेल्या. पण रामदिन आणि पोलार्ड यांनी 89 रनची पार्टनरशिप केली. पोलार्डने पहिली वन डे सेंच्युरी ठोकली. आणि तो होता तोपर्यंत विंडीजला विजयाची आशा होती. पण तो 119 रन करुन आऊट झाला. आणि विंडीजचं आव्हानही संपलं. त्याने अकरा सिक्स लगावले. भारतातर्फे रवी जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर पहिली बॅटिंग करताना भारतीय टीमने 267 रन केले ते मनोज तिवारीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेंच्युरीच्या जोरावर. त्याने 107 तर विराट कोहलीने 80 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close