S M L

कोकणात खेड नगरपालिकेवर मनसेचा झेंडा

12 डिसेंबरराज्यात रविवारी झालेल्या 168 पैकी 132 नगरपालिकांच्या मतदानाला आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालाप्रमाणे कोकणातल्या खेड नगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झेंडा फडकवला आहे. खेडमध्ये मनसेने 9 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. तर दापोलीत 3 जागा जिंकल्या आहे. खेड नगरपालिकेत मनसेला 9 जागा, शिवसेनेला 7 जागा, आणि राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालाबद्दल राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं. राज म्हणतात, खेडमध्ये मनसेला नगरपरिषदेत बहुमतानं सत्ता मिळाली आहे, त्यावर आम्ही समाधान व्यक्त करत आहोत तसेच पुढील निवडणुकातही मनसे अशाच लढत देईल आणि विजयी होईल अशा विश्वासही व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2011 10:59 AM IST

कोकणात खेड नगरपालिकेवर मनसेचा झेंडा

12 डिसेंबर

राज्यात रविवारी झालेल्या 168 पैकी 132 नगरपालिकांच्या मतदानाला आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालाप्रमाणे कोकणातल्या खेड नगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झेंडा फडकवला आहे. खेडमध्ये मनसेने 9 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. तर दापोलीत 3 जागा जिंकल्या आहे. खेड नगरपालिकेत मनसेला 9 जागा, शिवसेनेला 7 जागा, आणि राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालाबद्दल राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं. राज म्हणतात, खेडमध्ये मनसेला नगरपरिषदेत बहुमतानं सत्ता मिळाली आहे, त्यावर आम्ही समाधान व्यक्त करत आहोत तसेच पुढील निवडणुकातही मनसे अशाच लढत देईल आणि विजयी होईल अशा विश्वासही व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close