S M L

कापूस प्रश्नी मंत्र्यांच्या गाड्यांचे दिवे फोडले

12 डिसेंबरहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कापूस प्रश्न गाजला. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या गाड्यांचे दिवे भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी फोडले. त्यानतंर विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी कापूस दाखवत सरकारचा निषेध केला. कापसाला हमीभाव वाढवून मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी विरोधकांनी सभागृहाबाहेर आणि दोन्ही सभागृहांमध्ये केली. विधानसभेत शोक प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विधानसभेत एकीकडे गदारोळ सुरु असतानाच सरकारने दुसरीकडे मात्र 6 हजार तीनशे 28 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेतल्या. कापसाला हमी भाव देण्याची मागणी होत असतानाच प्रस्थापितांच्या सूत गिरण्यांसाठी दोनशे कोटी रुपयांची खिरापत सरकारने या पुरवणी मागण्यांमधून वाटली. पण विधान परिषदेत कापूस प्रश्नावर चर्चा झाली. सरकार या चर्चेला उद्या उत्तर देईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2011 03:59 PM IST

कापूस प्रश्नी मंत्र्यांच्या गाड्यांचे दिवे फोडले

12 डिसेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कापूस प्रश्न गाजला. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या गाड्यांचे दिवे भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी फोडले. त्यानतंर विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी कापूस दाखवत सरकारचा निषेध केला. कापसाला हमीभाव वाढवून मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी विरोधकांनी सभागृहाबाहेर आणि दोन्ही सभागृहांमध्ये केली. विधानसभेत शोक प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विधानसभेत एकीकडे गदारोळ सुरु असतानाच सरकारने दुसरीकडे मात्र 6 हजार तीनशे 28 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेतल्या. कापसाला हमी भाव देण्याची मागणी होत असतानाच प्रस्थापितांच्या सूत गिरण्यांसाठी दोनशे कोटी रुपयांची खिरापत सरकारने या पुरवणी मागण्यांमधून वाटली. पण विधान परिषदेत कापूस प्रश्नावर चर्चा झाली. सरकार या चर्चेला उद्या उत्तर देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2011 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close