S M L

जनतेचा कौल मान्य - नारायण राणे

13 डिसेंबरनगरपालिका निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे असं सांगत नारायण राणेंनी पराभव मान्य केला. पण वेंगुर्ल्यात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती आणि ती विरोधकांनीच घडवून आणली असा आरोपही राणेंनी केला. कोकणी माणसानं दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. कोकणी माणसानं मला राजकारणात आणलं आणि मला संपवण्याचा अधिकार ही त्यांनाच आहे. कोणी सुडाने,व्देषाने, षडयंत्राने राजकारण करुन राणेंना संपवू शकत नाही अशांना मी पुरन उरेन असा इशाराही राणेंनी दिला. काल सोमवारी निकाल लागल्यानंतर अखेर नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पराभवावर आपलं स्पष्ट केलं. पण सिंधुदुर्गात झालेल्या मतदानामुळे दहशत नव्हतीच हे सिद्ध झालंय असंही ते म्हणाले. यावेळी राणेंनी सिंदुधुर्ग जिल्ह्यात सगळ्यात कमी गुन्हे आहेत याचा दाखलाही दिला. त्याचबरोबर राणेंच्या पराभवावर राज ठाकरे यांनी अति बोलणं टाळावे असा सल्ला दिला राज यांचा सल्लाही राणे यांनी मान्य केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 08:17 AM IST

जनतेचा कौल मान्य - नारायण राणे

13 डिसेंबर

नगरपालिका निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे असं सांगत नारायण राणेंनी पराभव मान्य केला. पण वेंगुर्ल्यात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती आणि ती विरोधकांनीच घडवून आणली असा आरोपही राणेंनी केला. कोकणी माणसानं दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. कोकणी माणसानं मला राजकारणात आणलं आणि मला संपवण्याचा अधिकार ही त्यांनाच आहे. कोणी सुडाने,व्देषाने, षडयंत्राने राजकारण करुन राणेंना संपवू शकत नाही अशांना मी पुरन उरेन असा इशाराही राणेंनी दिला.

काल सोमवारी निकाल लागल्यानंतर अखेर नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पराभवावर आपलं स्पष्ट केलं. पण सिंधुदुर्गात झालेल्या मतदानामुळे दहशत नव्हतीच हे सिद्ध झालंय असंही ते म्हणाले. यावेळी राणेंनी सिंदुधुर्ग जिल्ह्यात सगळ्यात कमी गुन्हे आहेत याचा दाखलाही दिला. त्याचबरोबर राणेंच्या पराभवावर राज ठाकरे यांनी अति बोलणं टाळावे असा सल्ला दिला राज यांचा सल्लाही राणे यांनी मान्य केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 08:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close