S M L

राम गोपाल वर्मांची पलटी ; 26/11 वर करणार सिनेमा

13 डिसेंबरसिनेमा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता 26/11 वर सिनेमा करत आहे. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी आजही मनात ताज्या आहेत. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर राम गोपाल वर्मानं ताजला भेट दिली आणि विलासरावांना आपली खुर्चीही गमवावी लागली होती. त्यावेळी रामूने आपण 26/11 वर सिनेमा करणार नाही असंही सांगितलं होतं. पण आता तीन वर्षांनंतर राम गोपालने स्वत: 26/11वर सिनेमा करत असल्याचं ट्विट केलं आगे. 'कसाब द फेस ऑफ26/11'या पुस्तकाचा लेखक रॉमेल रॉड्रिग्स राम गेापाल वर्माला ऍसिस्ट करतोय. सिनेमा आंतरराष्ट्रीय, आणि भारतीय प्रेक्षकांसाठी बनवला जाईल. रामू या सिनेमासाठी पूर्ण वेगळे कलाकार घेणार आहे. त्याच्या मते हा सिनेमा म्हणजे एक मोठं आव्हान आहे. सध्या रामू डिपार्टमेंट सिनेमाचे काम करतोय.त्यात अमिताभ बच्चन यांचा गेस्ट ऍपियरन्स आहे. हा सिनेमा पूर्ण झाल्यावरच तो 26/11 हातात घेणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 05:15 PM IST

राम गोपाल वर्मांची पलटी ; 26/11 वर करणार सिनेमा

13 डिसेंबर

सिनेमा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता 26/11 वर सिनेमा करत आहे. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी आजही मनात ताज्या आहेत. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर राम गोपाल वर्मानं ताजला भेट दिली आणि विलासरावांना आपली खुर्चीही गमवावी लागली होती. त्यावेळी रामूने आपण 26/11 वर सिनेमा करणार नाही असंही सांगितलं होतं. पण आता तीन वर्षांनंतर राम गोपालने स्वत: 26/11वर सिनेमा करत असल्याचं ट्विट केलं आगे. 'कसाब द फेस ऑफ26/11'या पुस्तकाचा लेखक रॉमेल रॉड्रिग्स राम गेापाल वर्माला ऍसिस्ट करतोय. सिनेमा आंतरराष्ट्रीय, आणि भारतीय प्रेक्षकांसाठी बनवला जाईल. रामू या सिनेमासाठी पूर्ण वेगळे कलाकार घेणार आहे. त्याच्या मते हा सिनेमा म्हणजे एक मोठं आव्हान आहे. सध्या रामू डिपार्टमेंट सिनेमाचे काम करतोय.त्यात अमिताभ बच्चन यांचा गेस्ट ऍपियरन्स आहे. हा सिनेमा पूर्ण झाल्यावरच तो 26/11 हातात घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close