S M L

सांगलीत 3 नगरपालिकांवर राष्ट्रवादीचा झेंडा

14 डिसेंबरआज नगरपालिकांच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विदर्भात सगळ्याच पक्षांना लोकांनी कौल दिला. यात विशेष म्हणजे स्थानिक पक्षांच्या नेत्यांवर मतदारांनी विश्वास दाखवला. याठिकाणी काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिकांत राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिला. सांगली जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आर आर पाटील आणि जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पद्मसिंह पाटील यांना उस्मानाबादचा गड राखण्यात यश आलं आहे. पण जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकांमध्ये त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं नाही. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचं आव्हान मोडून काढलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 02:58 PM IST

सांगलीत 3 नगरपालिकांवर राष्ट्रवादीचा झेंडा

14 डिसेंबर

आज नगरपालिकांच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विदर्भात सगळ्याच पक्षांना लोकांनी कौल दिला. यात विशेष म्हणजे स्थानिक पक्षांच्या नेत्यांवर मतदारांनी विश्वास दाखवला. याठिकाणी काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिकांत राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिला. सांगली जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आर आर पाटील आणि जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पद्मसिंह पाटील यांना उस्मानाबादचा गड राखण्यात यश आलं आहे. पण जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकांमध्ये त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं नाही. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचं आव्हान मोडून काढलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close