S M L

उस्मानाबादमध्ये परांडा नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा

14 डिसेंबरआज राज्यातल्या 42 नगरपालिकांची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषदेत महायुतीने यश मिळविलं आहे. 17 पैकी 11 जागी महायुतीने विजय मिळवला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 4 जागी यश मिळालं आहे. सेनेचे माजी आमदार रवींद्र गायकवाड यांना या सेना, भाजप आणि रिपाईच्या या महायुतीने मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्यात असलेल्या दुहीचा फायदा महायुतीला झाल्याने सत्ताधारी आघाडीला त्यांनी या निवडणुकीत धूळ चारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परांडापरांडा नगरपरिषदेवर सेनेनं आपला झेंडा फडकाविला आहे.राष्ट्रवादीची सत्ता मोडित काढून सेनेनं जोरदार मुसंडी मारुन पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळविली आहे. अजित पवार यांचे कडवे समर्थक असलेल्या गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. परांडा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. एकूण जागा - 17 शिवसेना - 9राष्ट्रवादी - 4शहर विकास आघाडी (काँग्रेस) - 4

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 07:55 AM IST

उस्मानाबादमध्ये परांडा नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा

14 डिसेंबर

आज राज्यातल्या 42 नगरपालिकांची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषदेत महायुतीने यश मिळविलं आहे. 17 पैकी 11 जागी महायुतीने विजय मिळवला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 4 जागी यश मिळालं आहे. सेनेचे माजी आमदार रवींद्र गायकवाड यांना या सेना, भाजप आणि रिपाईच्या या महायुतीने मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्यात असलेल्या दुहीचा फायदा महायुतीला झाल्याने सत्ताधारी आघाडीला त्यांनी या निवडणुकीत धूळ चारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

परांडा

परांडा नगरपरिषदेवर सेनेनं आपला झेंडा फडकाविला आहे.राष्ट्रवादीची सत्ता मोडित काढून सेनेनं जोरदार मुसंडी मारुन पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळविली आहे. अजित पवार यांचे कडवे समर्थक असलेल्या गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. परांडा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. एकूण जागा - 17 शिवसेना - 9राष्ट्रवादी - 4शहर विकास आघाडी (काँग्रेस) - 4

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close