S M L

प्रसाद सावकार, सुधा करमरकरांना जीवनगौरव पुरस्कार

14 डिसेंबरज्येष्ठ गायक प्रसाद सावकार आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर यांना राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली. प्रसाद सावकार यांना अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार, तर सुधा करमरकर यांना प्रभाकर पणशीकर महाराष्ट्र रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच हे पुरस्कार दिले जातील. रंगभूमीवर दोघांचंही मोठं योगदान आहे. प्रसाद सावकारांची संगीत नाटकं आजही लोकप्रिय आहेत. तर सुधा करमरकर यांनी अनेक बालनाट्यांनी रंगभूमी समृद्ध केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 05:24 PM IST

प्रसाद सावकार, सुधा करमरकरांना जीवनगौरव पुरस्कार

14 डिसेंबर

ज्येष्ठ गायक प्रसाद सावकार आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर यांना राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली. प्रसाद सावकार यांना अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार, तर सुधा करमरकर यांना प्रभाकर पणशीकर महाराष्ट्र रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच हे पुरस्कार दिले जातील. रंगभूमीवर दोघांचंही मोठं योगदान आहे. प्रसाद सावकारांची संगीत नाटकं आजही लोकप्रिय आहेत. तर सुधा करमरकर यांनी अनेक बालनाट्यांनी रंगभूमी समृद्ध केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close