S M L

इंदू मिलचा प्रश्न पुन्हा पेटला

15 डिसेंबरइंदु मिलच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. इंदू मिलची फक्त 4 एकरच जागा देण्याची भूमिका बुधवारी लोकसभेत जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आज सकाळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या प्रियदर्शिनी परिसरात 25 ते 30 मिनिटं रास्ता रोको करुन सरकारच्या निर्णर्याचा निषेध त्यांनी केला. त्यावेळी टायर जाळून वाहतुकीची कोंडी करण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला.आता थोड्याच वेळात आरपीआय नेते रामदास आठवलेंसह हजारो कार्यकर्त्ये चैत्य भुमी ते इंदु मिल असा धडक मोर्चा काढणार आहे. यावेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या मागणीसाठी रिपाई कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. बाबा पेट्रोल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रितकुमार शेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 09:40 AM IST

इंदू मिलचा प्रश्न पुन्हा पेटला

15 डिसेंबर

इंदु मिलच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. इंदू मिलची फक्त 4 एकरच जागा देण्याची भूमिका बुधवारी लोकसभेत जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आज सकाळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या प्रियदर्शिनी परिसरात 25 ते 30 मिनिटं रास्ता रोको करुन सरकारच्या निर्णर्याचा निषेध त्यांनी केला. त्यावेळी टायर जाळून वाहतुकीची कोंडी करण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला.आता थोड्याच वेळात आरपीआय नेते रामदास आठवलेंसह हजारो कार्यकर्त्ये चैत्य भुमी ते इंदु मिल असा धडक मोर्चा काढणार आहे. यावेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या मागणीसाठी रिपाई कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. बाबा पेट्रोल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रितकुमार शेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close