S M L

शेतकर्‍यांसाठी 2 हजार कोटींचे पॅकेज

14 डिसेंबरराजातल्या कापूस, धान, आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. शेतकर्‍यांना 2 हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत केलीय. नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. पॅकेजच्या घोषणेनंतर विधान परिषदेत गोंधळ झाला. शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि काँग्रेसचे एस क्यू झामा यांच्यात धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. कापसाबाबत विरोधकांनी उद्या बंदचं आवाहन केलं आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन उद्या सभागृहाचे कामही चालू न देण्याचा इशारा दिला आहे.राज्यात कापूस, धान आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी मागिल महिन्यापासून विरोधकांनी राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. कापसाला सहा हजार रुपये हमी भाव देण्यात यावा मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. याचं बरोबर शिवसेना, मनसे आणि भाजपने आक्रमक होते ठिकठिकाणी आंदोलन केली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्‍यांना हेक्टरी मदत देण्यात येईल असं जाहीर केलं होते मात्र आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांनी यांची घोषणा केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हा निर्णय म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखा आहे असी टीका विरोधकांनी केली. कापूस प्रश्नी विरोधकांनी अधिक आक्रमक होते थेट दोन दिवस हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडले. एव्हान धानाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी धानाच्या मोळ्या विधानभवनाच्या पायर्‍यांवर जाळल्याने भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पटोले यांना एक वर्षासाठी म्हणजे पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.अखेर सरकारने आज कापूस, धान, आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली. यावेळी पॅकेजच्या घोषणेनंतर विधान परिषदेत विरोधकांनी एकच गोंधळ घातला. शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि काँग्रेसचे एस क्यू झामा यांच्यात धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर म्हणतात, सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरकारने पुन्हा तोंडाला पानं पुसली आहे. या पॅकेजमुळे शेतकर्‍यांना एकराला 2300 रुपये इतका कमी भाव मिळणार आहे. आणि धान उत्पादक शेतकरी यातून तर वगळला गेला आहे त्याला एकराला 940 रुपये येत कमी मिळणार आहे त्यामुळे सरकारच्या या पॅकेजला आम्ही विरोध करतो अशी भूमिका फुंडकर यांनी स्पष्ट केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 12:04 PM IST

शेतकर्‍यांसाठी 2 हजार कोटींचे पॅकेज

14 डिसेंबर

राजातल्या कापूस, धान, आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. शेतकर्‍यांना 2 हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत केलीय. नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. पॅकेजच्या घोषणेनंतर विधान परिषदेत गोंधळ झाला. शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि काँग्रेसचे एस क्यू झामा यांच्यात धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. कापसाबाबत विरोधकांनी उद्या बंदचं आवाहन केलं आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन उद्या सभागृहाचे कामही चालू न देण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात कापूस, धान आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी मागिल महिन्यापासून विरोधकांनी राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. कापसाला सहा हजार रुपये हमी भाव देण्यात यावा मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. याचं बरोबर शिवसेना, मनसे आणि भाजपने आक्रमक होते ठिकठिकाणी आंदोलन केली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्‍यांना हेक्टरी मदत देण्यात येईल असं जाहीर केलं होते मात्र आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांनी यांची घोषणा केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हा निर्णय म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखा आहे असी टीका विरोधकांनी केली. कापूस प्रश्नी विरोधकांनी अधिक आक्रमक होते थेट दोन दिवस हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडले. एव्हान धानाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी धानाच्या मोळ्या विधानभवनाच्या पायर्‍यांवर जाळल्याने भाजपचे आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पटोले यांना एक वर्षासाठी म्हणजे पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

अखेर सरकारने आज कापूस, धान, आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली. यावेळी पॅकेजच्या घोषणेनंतर विधान परिषदेत विरोधकांनी एकच गोंधळ घातला. शिवसेना आमदार दिवाकर रावते आणि काँग्रेसचे एस क्यू झामा यांच्यात धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर म्हणतात, सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरकारने पुन्हा तोंडाला पानं पुसली आहे. या पॅकेजमुळे शेतकर्‍यांना एकराला 2300 रुपये इतका कमी भाव मिळणार आहे. आणि धान उत्पादक शेतकरी यातून तर वगळला गेला आहे त्याला एकराला 940 रुपये येत कमी मिळणार आहे त्यामुळे सरकारच्या या पॅकेजला आम्ही विरोध करतो अशी भूमिका फुंडकर यांनी स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close