S M L

विरोधकांनी पुकारलेल्या बंदला समिश्र प्रतिसाद ; तोडफोड, रेल रोको

15 डिसेंबरकापूस, धान आणि सोयाबीन प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकर्‍यांसाठी 2 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले मात्र या पॅकेजला विरोधकांनी कडाडून विरोध केला. सरकारी पॅकेज म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली आहे अशी टीका विरोधकांनी केली. आज राज्य भरात सरकारी पॅकेजच्या विरोधात बंद पुकारला. जळगावमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. फुले मार्केटमध्ये काही दुकानांची तोडफोडही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व व्यापारी संकुल बंद केली होती. परभणीत बंदला चांगला प्रतिसाद कापसाला वाढीव हमीभाव मिळावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला परभणी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.सेना,भाजप आणि रिपाईने पुकारलेल्या या बंदमुळे परभणीला शाळा- कॉलेजेस बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्याभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून कोणताही अनुचित गैरप्रकार घडू नये याकरीता पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. वाशीममध्ये बंदला समिश्र प्रतिसादवाशीम जिल्हात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. कापसाला वाढीव हमी भाव देण्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. जउळका रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी अकोला- पुर्णा रेल्वेगाडी जवळपास 45 मिनिटे रोखून ठेवली होती. पोलिसांनी 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. औरंगाबादमध्ये शिवसैनिकांची निदर्शनऔरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपने पुकारलेल्या बंदला शहरात समिश्र प्रतिसात मिळत आहे. शिवसैनिकांनी गुलमंडी आणि सिटी चौकात निदर्शने केली आहे. औरंगाबादमध्ये बंदच आवाहन करणार्‍या 100 शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. सिडको पोलिसांनी ही कारवाई केली आहे.बीडमध्ये बाजारपेठेत शुकशुकाटकापसाला वाढीव हमी भाव मिळावा या मागणीसाठी भाजप शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला बीड शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या काही भागात वाहतूक सुरु आहे पण शहरातील मुख्य बाजारपेठेत मात्र आज शुकशुकाट आहे. सेना-भाजपने पुकारलेल्या बंदला यवतमाळ जिल्हा बंदला चंागला प्रतिसाद मिळतोय. शहरातील सर्व प्रमुख व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला आपला पाठिंबा दिला. शिवसैनिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 10:58 AM IST

विरोधकांनी पुकारलेल्या बंदला समिश्र प्रतिसाद ; तोडफोड, रेल रोको

15 डिसेंबर

कापूस, धान आणि सोयाबीन प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकर्‍यांसाठी 2 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले मात्र या पॅकेजला विरोधकांनी कडाडून विरोध केला. सरकारी पॅकेज म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली आहे अशी टीका विरोधकांनी केली. आज राज्य भरात सरकारी पॅकेजच्या विरोधात बंद पुकारला. जळगावमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. फुले मार्केटमध्ये काही दुकानांची तोडफोडही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व व्यापारी संकुल बंद केली होती.

परभणीत बंदला चांगला प्रतिसाद

कापसाला वाढीव हमीभाव मिळावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला परभणी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.सेना,भाजप आणि रिपाईने पुकारलेल्या या बंदमुळे परभणीला शाळा- कॉलेजेस बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्याभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून कोणताही अनुचित गैरप्रकार घडू नये याकरीता पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

वाशीममध्ये बंदला समिश्र प्रतिसादवाशीम जिल्हात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. कापसाला वाढीव हमी भाव देण्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. जउळका रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी अकोला- पुर्णा रेल्वेगाडी जवळपास 45 मिनिटे रोखून ठेवली होती. पोलिसांनी 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. औरंगाबादमध्ये शिवसैनिकांची निदर्शन

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपने पुकारलेल्या बंदला शहरात समिश्र प्रतिसात मिळत आहे. शिवसैनिकांनी गुलमंडी आणि सिटी चौकात निदर्शने केली आहे. औरंगाबादमध्ये बंदच आवाहन करणार्‍या 100 शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. सिडको पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बीडमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट

कापसाला वाढीव हमी भाव मिळावा या मागणीसाठी भाजप शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला बीड शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या काही भागात वाहतूक सुरु आहे पण शहरातील मुख्य बाजारपेठेत मात्र आज शुकशुकाट आहे. सेना-भाजपने पुकारलेल्या बंदला यवतमाळ जिल्हा बंदला चंागला प्रतिसाद मिळतोय. शहरातील सर्व प्रमुख व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला आपला पाठिंबा दिला. शिवसैनिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close