S M L

स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्याचा सरकारचा नकार

14 डिसेंबरमुंबईतल्या इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून रिपब्लिकन नेते आणि भीमसैनिक आंदोलन करत आहे. पण, या नेत्यांच्या अपेक्षेवर केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी पाणी फेरले आहे. स्मारकासाठी संपूर्ण 12 एकर जागा देणं शक्य नसल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पी. लक्ष्मी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फक्त 4 एकर जागा देण्यावर विचार होऊ शकतो, असं लक्ष्मी यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या स्मारकाला देण्यासाठी सरकार गंभीर नाही, असा आरोप आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केला. ही जागा देण्याचा निर्णय झाला नाही तर उद्या चैत्यभूमीवर भव्य मोर्चा नेणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 05:14 PM IST

स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जागा देण्याचा सरकारचा नकार

14 डिसेंबर

मुंबईतल्या इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून रिपब्लिकन नेते आणि भीमसैनिक आंदोलन करत आहे. पण, या नेत्यांच्या अपेक्षेवर केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी पाणी फेरले आहे. स्मारकासाठी संपूर्ण 12 एकर जागा देणं शक्य नसल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पी. लक्ष्मी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फक्त 4 एकर जागा देण्यावर विचार होऊ शकतो, असं लक्ष्मी यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या स्मारकाला देण्यासाठी सरकार गंभीर नाही, असा आरोप आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केला. ही जागा देण्याचा निर्णय झाला नाही तर उद्या चैत्यभूमीवर भव्य मोर्चा नेणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close