S M L

खुशखबर..पुण्याजवळचे स्टेडियम तयार

15 डिसेंबरपुणेकर क्रिकेट रसिकांसाठी एक खूषखबर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहुंजे इथलं स्टेडियम आता तयार झालं आहे. 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश या रणजी क्रिकेट मॅचने स्टेडियमचे उदघाटन होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वेला लागून असलेलं हे स्टेडियम पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक कारणांनी हे स्टेडिअम गेल्या काही वर्षांपासून रखडलं होतं. आयपीएलमधल्या पुणे टीमलाही गेल्या वर्षी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर खेळावलं लागलं होतं. पण पुणे टीमलाही अखेर त्यांचं हक्काचं स्टेडिअम मिळालं आहे. या स्टेडिअमवर रणजी, आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय मॅचही खेळवल्या जातील अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 03:20 PM IST

खुशखबर..पुण्याजवळचे स्टेडियम तयार

15 डिसेंबर

पुणेकर क्रिकेट रसिकांसाठी एक खूषखबर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहुंजे इथलं स्टेडियम आता तयार झालं आहे. 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश या रणजी क्रिकेट मॅचने स्टेडियमचे उदघाटन होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वेला लागून असलेलं हे स्टेडियम पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक कारणांनी हे स्टेडिअम गेल्या काही वर्षांपासून रखडलं होतं. आयपीएलमधल्या पुणे टीमलाही गेल्या वर्षी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर खेळावलं लागलं होतं. पण पुणे टीमलाही अखेर त्यांचं हक्काचं स्टेडिअम मिळालं आहे. या स्टेडिअमवर रणजी, आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय मॅचही खेळवल्या जातील अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close