S M L

लोकपाल विधेयक 20 डिसेंबरला संसदेत ?

15 डिसेंबरलोकपाल विधेयक याच अधिवेशनात 20 डिसेंबरला मांडलं जाण्याची शक्यता आहे. पण त्यावर चर्चा करून विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार जानेवारी महिन्यात विशेष विस्तारीत अधिवेशन बोलावेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 19 डिसेंबरपासून काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावं, असं व्हिप काँग्रेस हायकंमाडने बजावले आहे. याच अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे अशी आग्रही मागणी टीम अण्णांची आहे. पण, टीम अण्णांनी संयम ठेवावा सरकारवर अटी लादू नयेत असं काँग्रेसने म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपनंही याच अधिवेशनात लोकपाल विधेयक यावे अशी मागणी भाजपनंही केली आहे. त्यामुळे हे विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मंजूर होईल, याची शक्यता खूपच धूसर आहे. रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकपालचा मसुदा तयार करण्यात येईल. त्यानंतर 20 डिसेंबरला हे विधेयक संसदेत मांडण्याचा सरकारचा विचार आहे. पण सीबीआयला लोकपालच्या कक्षेत आणायचं की नाही, यासह अनेक मुद्द्यांवरुन सर्वच पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे उरलेल्या दोन दिवसात या विधेयकावर चर्चा आणि सार्वमत होणं शक्य नाही. तेव्हा गरज पडली तर जानेवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान टीम अण्णा सक्षम लोकपालसाठी चौथ्या आंदोलनासाठी सज्ज आहे. येत्या 27 डिसेंबरपासून उपोषण आणि 1 जानेवारीपासून जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली तसेच ज्यांनी लोकपालला विरोध केला त्या खासदारांच्या घरासमोर धरणं दिली जातील असंही अण्णांनी म्हटलं. पण लोकपाल बिल या अगोदर आलं तर आंदोलन करणार नाही त्यावेजी कृतज्ञता दिवस साजरा करण्यात येईल आणि सरकारमधल्या प्रमुख नेत्यांना उपोषण स्थळी बोलावून गुलाब देऊन त्यांचा सत्कार करु असं अण्णांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 05:14 PM IST

लोकपाल विधेयक 20 डिसेंबरला संसदेत ?

15 डिसेंबर

लोकपाल विधेयक याच अधिवेशनात 20 डिसेंबरला मांडलं जाण्याची शक्यता आहे. पण त्यावर चर्चा करून विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार जानेवारी महिन्यात विशेष विस्तारीत अधिवेशन बोलावेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 19 डिसेंबरपासून काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावं, असं व्हिप काँग्रेस हायकंमाडने बजावले आहे. याच अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे अशी आग्रही मागणी टीम अण्णांची आहे. पण, टीम अण्णांनी संयम ठेवावा सरकारवर अटी लादू नयेत असं काँग्रेसने म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपनंही याच अधिवेशनात लोकपाल विधेयक यावे अशी मागणी भाजपनंही केली आहे.

त्यामुळे हे विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मंजूर होईल, याची शक्यता खूपच धूसर आहे. रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकपालचा मसुदा तयार करण्यात येईल. त्यानंतर 20 डिसेंबरला हे विधेयक संसदेत मांडण्याचा सरकारचा विचार आहे. पण सीबीआयला लोकपालच्या कक्षेत आणायचं की नाही, यासह अनेक मुद्द्यांवरुन सर्वच पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे उरलेल्या दोन दिवसात या विधेयकावर चर्चा आणि सार्वमत होणं शक्य नाही. तेव्हा गरज पडली तर जानेवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान टीम अण्णा सक्षम लोकपालसाठी चौथ्या आंदोलनासाठी सज्ज आहे. येत्या 27 डिसेंबरपासून उपोषण आणि 1 जानेवारीपासून जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली तसेच ज्यांनी लोकपालला विरोध केला त्या खासदारांच्या घरासमोर धरणं दिली जातील असंही अण्णांनी म्हटलं. पण लोकपाल बिल या अगोदर आलं तर आंदोलन करणार नाही त्यावेजी कृतज्ञता दिवस साजरा करण्यात येईल आणि सरकारमधल्या प्रमुख नेत्यांना उपोषण स्थळी बोलावून गुलाब देऊन त्यांचा सत्कार करु असं अण्णांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close