S M L

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडे

16 डिसेंबरविधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडेंची नियुक्ती झाली आहे अशी घोषणा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी नागपुरात केली. तावडे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला अधिकृतरित्या पदभार स्विकारतील. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये मुंडे -गडकरी गटांत धुसफूस सुरू होती. तावडे गडकरींचे जवळचे समर्थक मानले जातात. पक्षश्रेष्ठी तावडेंच्या निवडीवर ठाम होते. सध्याचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांचा राजीनामा कार्यकारिणीने स्विकारला आहे. मात्र आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे गटाचा एकही समर्थक उपस्थित नव्हता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 10:06 AM IST

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडे

16 डिसेंबर

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडेंची नियुक्ती झाली आहे अशी घोषणा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी नागपुरात केली. तावडे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला अधिकृतरित्या पदभार स्विकारतील. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये मुंडे -गडकरी गटांत धुसफूस सुरू होती. तावडे गडकरींचे जवळचे समर्थक मानले जातात. पक्षश्रेष्ठी तावडेंच्या निवडीवर ठाम होते. सध्याचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांचा राजीनामा कार्यकारिणीने स्विकारला आहे. मात्र आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे गटाचा एकही समर्थक उपस्थित नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close