S M L

अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत डहाके

16 डिसेंबरप्रसिद्ध लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांची चंद्रपूर इथं होणार्‍या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी वसंत आबाजी डहाके, प्रतिमा इंगोले आणि जवाहर मुथा असे तीन साहित्यिक अध्यक्षपदाच्या रिंगणात होते. वसंत आबाजी डहाके यांना 374 मत मिळाली. तर प्रतिभा इंगोले यांना 159 मत मिळाली. तर जवाहर मुथा यांना 17 मत मिळाली आहे. अध्यपदाच्या निवडीसाठी अगोदरच डहाके यांचे पारडं जड असल्याचं बोललं जात होतं आणि निकालही अपेक्षित आला. पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान चंद्रपूर येथे हे संमेलन होणार आहे.वसंत डहाके हे भाषातज्ञ आणि कोशकार म्हणूनही ओळखले जातात. वसंत डहाके हे सगळ्यांच्या परिचयाचे झाले ते 1966 साली सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे. त्यांच्या कविता या आषयाच्या खोल डोहात नेणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. डहाके यांनी समिक्षा आणि कोश वांड्मयात केलेलं काम फार मोठं आहे. डहाके सरांनी संक्षिप्त मराठी वाड:मय कोश, वाड्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश, शालेय मराठी शब्दकोशाचं संपादन केलं आहे. त्यांचं हे काम मराठी भाषेसाठी अत्यंत मोलाचं आहे. डहाके सर नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहत शांतपणे त्यांचं काम करीत राहिले. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या सार्‍या कर्तृत्वाचा सन्मान करत त्याना जीवनव्रती पुरस्कार दिला. त्याचबरोबर त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी 2009 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 05:27 PM IST

अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत डहाके

16 डिसेंबर

प्रसिद्ध लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांची चंद्रपूर इथं होणार्‍या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी वसंत आबाजी डहाके, प्रतिमा इंगोले आणि जवाहर मुथा असे तीन साहित्यिक अध्यक्षपदाच्या रिंगणात होते. वसंत आबाजी डहाके यांना 374 मत मिळाली. तर प्रतिभा इंगोले यांना 159 मत मिळाली. तर जवाहर मुथा यांना 17 मत मिळाली आहे. अध्यपदाच्या निवडीसाठी अगोदरच डहाके यांचे पारडं जड असल्याचं बोललं जात होतं आणि निकालही अपेक्षित आला. पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान चंद्रपूर येथे हे संमेलन होणार आहे.

वसंत डहाके हे भाषातज्ञ आणि कोशकार म्हणूनही ओळखले जातात. वसंत डहाके हे सगळ्यांच्या परिचयाचे झाले ते 1966 साली सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे. त्यांच्या कविता या आषयाच्या खोल डोहात नेणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. डहाके यांनी समिक्षा आणि कोश वांड्मयात केलेलं काम फार मोठं आहे. डहाके सरांनी संक्षिप्त मराठी वाड:मय कोश, वाड्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश, शालेय मराठी शब्दकोशाचं संपादन केलं आहे. त्यांचं हे काम मराठी भाषेसाठी अत्यंत मोलाचं आहे.

डहाके सर नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहत शांतपणे त्यांचं काम करीत राहिले. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या सार्‍या कर्तृत्वाचा सन्मान करत त्याना जीवनव्रती पुरस्कार दिला. त्याचबरोबर त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी 2009 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close