S M L

बीआरटीचा पसार्‍यात, उड्डाणपुलाला मंजुरी

16 डिसेंबरपुण्यामध्ये आधीच बीआरटीचा बोजवारा उडाला आहे आणि त्यातच आता या बीआरटी मार्गावर एका नव्या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली आहे. धनकवडी ते कात्रज दरम्यान हा फ्लायओव्हर बांधला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली. अनेक दिवसांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे इथे फ्लायओव्हर बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी दिली. यामुळे आता आधीच बोजवारा उडालेल्या बीआरटी रुटवर काही काळ का होईना नागरिकांना आणखी त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर मात्र बीआरटीसाठी डेडिकेटेड लेन तयार होणार आहे. नागरिकांनी या प्रकल्पाबाबत समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 04:25 PM IST

बीआरटीचा पसार्‍यात, उड्डाणपुलाला मंजुरी

16 डिसेंबर

पुण्यामध्ये आधीच बीआरटीचा बोजवारा उडाला आहे आणि त्यातच आता या बीआरटी मार्गावर एका नव्या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली आहे. धनकवडी ते कात्रज दरम्यान हा फ्लायओव्हर बांधला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली. अनेक दिवसांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे इथे फ्लायओव्हर बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार या फ्लायओव्हरला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी दिली. यामुळे आता आधीच बोजवारा उडालेल्या बीआरटी रुटवर काही काळ का होईना नागरिकांना आणखी त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर मात्र बीआरटीसाठी डेडिकेटेड लेन तयार होणार आहे. नागरिकांनी या प्रकल्पाबाबत समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close