S M L

इंदू मिलसाठी भीमसैनिकांचे राज्यभरात आंदोलन

16 डिसेंबरइंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी आज मुंबईतील परळ पुलाजवळ युथ रिपब्लिकनच्या कार्यकर्त्याचा रास्ता रोको केला. मनोज संसारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन करणार्‍या 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर नाशिकमध्येही आरपीआय आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. दादाभाऊ निकम आणि दिलीप दासवानी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी महसूल आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. तर पुण्यात सुध्दा भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अलका टॉकिजजवळही निदर्शनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 11:00 AM IST

इंदू मिलसाठी भीमसैनिकांचे राज्यभरात आंदोलन

16 डिसेंबर

इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी आज मुंबईतील परळ पुलाजवळ युथ रिपब्लिकनच्या कार्यकर्त्याचा रास्ता रोको केला. मनोज संसारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन करणार्‍या 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर नाशिकमध्येही आरपीआय आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. दादाभाऊ निकम आणि दिलीप दासवानी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी महसूल आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. तर पुण्यात सुध्दा भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अलका टॉकिजजवळही निदर्शनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close