S M L

गृहकर्जदारांना रिझर्व बँकेचा दिलासा

16 डिसेंबरगृहकर्ज घेतलेल्यांसाठी रिझर्व्ह बँकेने आज थोडासा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर केलं आहे. यात व्याज दरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर सीआरआर, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्येही कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यात तब्बल 13 वेळा व्याजदर वाढवले आहे. पण यापुढे व्याज दर वाढवण्याची गरज पडणार नाही, असे संकेत दिले आहे. व्याज दर आणखी वाढवले तर आधीच घसरणीला लागलेला औद्योगिक उत्पादन दर आणि आर्थिक विकास दर यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतरही शेअर बाजारात नकारात्मक भावना आहे. पतधोरण जाहीर होताच सेन्सेक्स साडेतिनशे अंकांनी कोसळला. त्यामुळे बाजार बंद करावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 04:56 PM IST

गृहकर्जदारांना रिझर्व बँकेचा दिलासा

16 डिसेंबर

गृहकर्ज घेतलेल्यांसाठी रिझर्व्ह बँकेने आज थोडासा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर केलं आहे. यात व्याज दरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर सीआरआर, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्येही कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यात तब्बल 13 वेळा व्याजदर वाढवले आहे. पण यापुढे व्याज दर वाढवण्याची गरज पडणार नाही, असे संकेत दिले आहे. व्याज दर आणखी वाढवले तर आधीच घसरणीला लागलेला औद्योगिक उत्पादन दर आणि आर्थिक विकास दर यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतरही शेअर बाजारात नकारात्मक भावना आहे. पतधोरण जाहीर होताच सेन्सेक्स साडेतिनशे अंकांनी कोसळला. त्यामुळे बाजार बंद करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close