S M L

फडणवीस यांनी मांडले खासगी लोकायुक्त विधेयक

17 डिसेंबरमहाराष्ट्रात लोकायुक्त मजबुत करण्यासाठी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी खासगी स्वरूपात लोकायुक्त आणि उपायुक्त विधेयक आज विधानसभेत मांडलं. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी ते विधेयक दाखल करून घेतलं आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोकायुक्त आहेत मात्र त्यांना कुठलेही अधिकार नाहीत. त्यामुळे अण्णांनी सक्षम लोकायुक्तांंसाठी विधेयक आणण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने या अधिवेशनात ते विधेयक काही आणलेलं नाही. त्याच बरोबर उत्तरदायी पारदर्शक प्रभावी आणि उत्तरदायी शासकीय सेवा प्रदान करणारे उत्तम प्रशासन हा नागरिकांचा अधिकार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा अधिनियम 2011 हे अशासकीय विधेयकही देवेंद्र फडणविस यांनी मांडले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 09:28 AM IST

फडणवीस यांनी मांडले खासगी लोकायुक्त विधेयक

17 डिसेंबर

महाराष्ट्रात लोकायुक्त मजबुत करण्यासाठी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी खासगी स्वरूपात लोकायुक्त आणि उपायुक्त विधेयक आज विधानसभेत मांडलं. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी ते विधेयक दाखल करून घेतलं आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोकायुक्त आहेत मात्र त्यांना कुठलेही अधिकार नाहीत. त्यामुळे अण्णांनी सक्षम लोकायुक्तांंसाठी विधेयक आणण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने या अधिवेशनात ते विधेयक काही आणलेलं नाही. त्याच बरोबर उत्तरदायी पारदर्शक प्रभावी आणि उत्तरदायी शासकीय सेवा प्रदान करणारे उत्तम प्रशासन हा नागरिकांचा अधिकार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा अधिनियम 2011 हे अशासकीय विधेयकही देवेंद्र फडणविस यांनी मांडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close