S M L

कांजुरमार्ग येथील कंपनीत घुसला बिबट्या

17 डिसेंबरआज शनिवारी सकाळी मुंबईतल्या कांजुरमार्ग मधल्या जॉली बोर्ड कंपनीत अचानक बिबट्या घुसला. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वनखात्याला याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वनखात्याची रेस्क्यु टीम रवाना झाली. आतापर्यंत या बिबट्याने कोणालाही जखमी केलं नसल्याची माहिती वन अधिकार्‍यानी दिली. आतापर्यंत नॅशनल पार्कमधले बिबटे जंगलाच्या आजुबाजुला वावरताना आढळले होते. पण आज हा बिबट्या जंगलाच्या हद्दीपासून सात किमी लांब असलेल्या कंपनीत कसा काय आला. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 11:07 AM IST

कांजुरमार्ग येथील कंपनीत घुसला बिबट्या

17 डिसेंबर

आज शनिवारी सकाळी मुंबईतल्या कांजुरमार्ग मधल्या जॉली बोर्ड कंपनीत अचानक बिबट्या घुसला. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वनखात्याला याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वनखात्याची रेस्क्यु टीम रवाना झाली. आतापर्यंत या बिबट्याने कोणालाही जखमी केलं नसल्याची माहिती वन अधिकार्‍यानी दिली. आतापर्यंत नॅशनल पार्कमधले बिबटे जंगलाच्या आजुबाजुला वावरताना आढळले होते. पण आज हा बिबट्या जंगलाच्या हद्दीपासून सात किमी लांब असलेल्या कंपनीत कसा काय आला. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close