S M L

'लोकपाल' उद्या मंत्रिमंडळासमोर मांडणार - पंतप्रधान

17 डिसेंबरलोकपाल विधेयक हे चालू हिवाळी अधिवेशनातच मंजूर व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर उद्याच हे विधेयक मांडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मात्र अण्णा हजारे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे आज अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लोकपाल विधेयक या अधिवेशनात आले नाही तर नाइलाजास्तव 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर अण्णांनी या पत्रात स्थायी समितीने दिलेल्या अहवालावर टीका केली. तसेच अण्णा हजारे लोकपालवरची चर्चा संसदेत बसून ऐकणार आहेत. येत्या 19, 20 आणि 21 डिसेंबरला ही चर्चा होण्याची शक्यता असून अण्णा लोकसभेच्या व्हिजिटर्स गॅलरीत बसून ही चर्चा ऐकणार आहेत. उद्या लोकपाल विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता असून सोमवारी ते लोकसभेत मांडलं जाईल. दरम्यान लोकपालविषयी जनजागृती करण्यासाठी टीम अण्णांनी आज बंगळुरुमध्ये मेळावा घेतला. लोकपालविषयी सरकारमध्येच एकमत नसल्याची टीकाही यावेळी अण्णांनी केली. तर गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही अण्णांनी गंभीर आरोप केलेत. जर लोकपाल आता असते तर चिदंबरम जेलमध्ये असते असा आरोप अण्णांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 02:24 PM IST

'लोकपाल' उद्या मंत्रिमंडळासमोर मांडणार  - पंतप्रधान

17 डिसेंबर

लोकपाल विधेयक हे चालू हिवाळी अधिवेशनातच मंजूर व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर उद्याच हे विधेयक मांडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मात्र अण्णा हजारे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे आज अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लोकपाल विधेयक या अधिवेशनात आले नाही तर नाइलाजास्तव 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर अण्णांनी या पत्रात स्थायी समितीने दिलेल्या अहवालावर टीका केली.

तसेच अण्णा हजारे लोकपालवरची चर्चा संसदेत बसून ऐकणार आहेत. येत्या 19, 20 आणि 21 डिसेंबरला ही चर्चा होण्याची शक्यता असून अण्णा लोकसभेच्या व्हिजिटर्स गॅलरीत बसून ही चर्चा ऐकणार आहेत. उद्या लोकपाल विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता असून सोमवारी ते लोकसभेत मांडलं जाईल. दरम्यान लोकपालविषयी जनजागृती करण्यासाठी टीम अण्णांनी आज बंगळुरुमध्ये मेळावा घेतला. लोकपालविषयी सरकारमध्येच एकमत नसल्याची टीकाही यावेळी अण्णांनी केली. तर गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही अण्णांनी गंभीर आरोप केलेत. जर लोकपाल आता असते तर चिदंबरम जेलमध्ये असते असा आरोप अण्णांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close