S M L

गोसीखुर्द प्रकल्पात 3 हजार कोटींचा घोटाळा

आशिष जाधव,नागपूर18 डिसेंबरविदर्भातल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपायांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. एकट्या बहुचर्चित गोसी खुर्द प्रकल्पात 3000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाचे पैसे अडवून धरले आहेत.विदर्भात मोठ्या नद्या असूनही जलसिंचन प्रकल्प राबविले गेले नाहीत. पण कोरडवाहू शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्यानंतर मात्र विदर्भातील प्रस्तावित जलसिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली. विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंचनाच्या निविदा भराभर जारी होऊ लागल्या. निधीचे वाटप होऊ लागलं. पण आता महामंडळाने अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा कित्येक पट अधिक रकमेच्या निविदा काढल्याचे स्पष्ट झालं आहे. 2007 ते 2009 या दोन आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांचा निधी असताना महामंडळाने 11,238 रुपयांच्या निविदा काढल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झालंय. गोसी खूर्द- 90 कामबेंबळा - 44 कामनिम्न वर्धा - 33 कामबावनथडी - 15 कामनेरला - 14 कामखडकपूर्णा - 13 कामजीगाव- 9 कामइतर प्रकल्पांची 163 काम या कामांमध्ये मोठा घोळ झाला आहे. त्यामुळेच माजी जलसिंचन राज्यमंत्र्यांनी विदर्भातल्या सर्व सिंचन प्रकल्पांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. वैनगंगा नदीवरचा गोसीखुर्द प्रकल्प केंद्राने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषीत केला. सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चाचा 90 भार केंद्राने उचलला आहे. पण गेल्या 4 वर्षात या प्रकल्पांच्या 90 निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा चौकशी अहवाल राज्य सरकारने विधिमंडळात मांडला. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने निविदा मंजूर झाल्या. त्यात हजारो कोटींची रक्कम आगाऊ अदा करण्यात आली. या एकट्या गोसीखुर्द प्रकल्पामध्ये 3000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय कॅगला आला. त्यामुळे केंद्र सरकारनंसुद्धा गेल्या 2 वर्षांपासून गोसीखुर्द प्रकल्पाचा निधी अडवून ठेवला. याबाबत आता खुद्द मुख्यमंत्रीही खंत व्यक्त केली. आधी नियोजन करायचं नाही. मग ओलीताअभावी शेतकरी हवालदिल झाल्यावर प्रस्तावित प्रकल्पांची कामं जोरात काढायची. अन् त्यात कंत्राटदारांना रान मोकळं करून द्यायचं असा हा प्रकार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 01:37 PM IST

गोसीखुर्द प्रकल्पात 3 हजार कोटींचा घोटाळा

आशिष जाधव,नागपूर

18 डिसेंबर

विदर्भातल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपायांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. एकट्या बहुचर्चित गोसी खुर्द प्रकल्पात 3000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाचे पैसे अडवून धरले आहेत.

विदर्भात मोठ्या नद्या असूनही जलसिंचन प्रकल्प राबविले गेले नाहीत. पण कोरडवाहू शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्यानंतर मात्र विदर्भातील प्रस्तावित जलसिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली. विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंचनाच्या निविदा भराभर जारी होऊ लागल्या. निधीचे वाटप होऊ लागलं. पण आता महामंडळाने अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा कित्येक पट अधिक रकमेच्या निविदा काढल्याचे स्पष्ट झालं आहे.

2007 ते 2009 या दोन आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांचा निधी असताना महामंडळाने 11,238 रुपयांच्या निविदा काढल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झालंय.

गोसी खूर्द- 90 कामबेंबळा - 44 कामनिम्न वर्धा - 33 कामबावनथडी - 15 कामनेरला - 14 कामखडकपूर्णा - 13 कामजीगाव- 9 कामइतर प्रकल्पांची 163 काम

या कामांमध्ये मोठा घोळ झाला आहे. त्यामुळेच माजी जलसिंचन राज्यमंत्र्यांनी विदर्भातल्या सर्व सिंचन प्रकल्पांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. वैनगंगा नदीवरचा गोसीखुर्द प्रकल्प केंद्राने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषीत केला. सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चाचा 90 भार केंद्राने उचलला आहे. पण गेल्या 4 वर्षात या प्रकल्पांच्या 90 निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा चौकशी अहवाल राज्य सरकारने विधिमंडळात मांडला. अ

धिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने निविदा मंजूर झाल्या. त्यात हजारो कोटींची रक्कम आगाऊ अदा करण्यात आली. या एकट्या गोसीखुर्द प्रकल्पामध्ये 3000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय कॅगला आला. त्यामुळे केंद्र सरकारनंसुद्धा गेल्या 2 वर्षांपासून गोसीखुर्द प्रकल्पाचा निधी अडवून ठेवला. याबाबत आता खुद्द मुख्यमंत्रीही खंत व्यक्त केली. आधी नियोजन करायचं नाही. मग ओलीताअभावी शेतकरी हवालदिल झाल्यावर प्रस्तावित प्रकल्पांची कामं जोरात काढायची. अन् त्यात कंत्राटदारांना रान मोकळं करून द्यायचं असा हा प्रकार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close